कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला
पनवेल/ दिपक घरत: कर्नाळा पक्षी अभयारण्य हे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक आणि पक्षीप्रेमी येत असतात. मात्र हे कर्नाळा अभयारण्य आता पर्यटकांसाठी धोकादायक असल्याची घटना घडली आहे. पनवेल ग्रामीणतालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटनासाठी आलेल्या पन्नास ते साठ पर्यटकानवर मधमाशानी हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली आहे.
पनवेल ग्रामीण ( वा ) तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकानवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी घडलीआहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची माहिती कर्नाळा पक्षी अभयारण्याचे वनशेत्रपाल नारायण राठोड यांनी दिली असून,संदिप पुरोहित राहणार कोपरखैरणे असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.
Shani Shingnapur News: शनिशिंगणापुरात शनिदेवाला आता ब्रँडेड तेलाचा अभिषेक होणार, देवस्थानचा निर्णय
मधमाशांनी केलेल्या हल्ल्या नंतर झालेल्या पळापळीत पडून पुरोहित यांचा मृत्यू झाल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शिनी वर्तवली आहे.तर इतर जखमीनवर पनवेल मधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून,उपजिल्हा रुग्णालयात दाखल एका पर्यटकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे.तर काही पर्यटकानवर नजदिकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहिती नुसार मुंबई तसेच नवी मुंबई येथून पर्यटना साठी आलेल्या काही पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला चढविला. हे सर्व पर्यटक मिळून कर्नाळा किल्ल्याकडे चालत जात होते. अभयारण्यातून वाट काढताना अचानक मधमाश्यांच्या थव्याने या पर्यटकांवर हल्ला चढवला.
मधमाशांचा थवा मोठा असल्याने पर्यटक स्वतःला वाचवण्यासाठी पळापळ करू लागले. यावेळी या पर्यटकांमध्ये एक पर्यटक बेशुद्ध झाला. त्याला इतर पर्यटक आणि वन कर्मचाऱ्यांनी जवळील रूग्णालयात दाखल केले. बेशुद्ध अवस्थेत आलेल्या दोन पर्यटकांना जवळच्या रूग्णालयात दाखल केले.जुन्या मुंबई – पुणे महमार्गांवर असलेले कर्नाळा पक्षी अभय आरण्य पर्यटकांचे आवडते ठिकाण असून, या ठिकाणी शनिवारी,रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.शनिवारी देखील माटुंगा येथील व्ही जे टी आय येथील कॉलेजची सहा मुले ट्रेकिंग साठी किल्ल्यावरती आले असता त्यांच्यावरती मध माशांनी हल्ला केला आहे.यात कॉलेज मधील रुद्र साहू, अनिश आणि अंश वाघ या तिघांचा समावेश आहे.
सांगलीतील निवृत्त बँक कर्मचाऱ्याची फसवणूक; तब्बल 22 लाखांना घातला गंडा
निसर्ग मित्र संस्था पनवेल चे सदस्य मदतीला
सकाळी 11 च्या सुमारास घडलेल्या घटनेची माहिती मिळताच निसर्ग मित्र संस्था पनवेलचे सदस्य मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले होते. वानकर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने जखमी झालेल्या काही पर्यटकांना खांद्यावर तसेच स्ट्रेचर च्या सहाय्याने खाली आणल्याची माहिती संस्थेचे सदस्य पराग सरोदे यांनी दिली आहे.