चक्क महामार्गावरून 'धावली रेल्वे'; पुणे-नाशिक महामार्गावर दिसली रेल्वे अन्... (Photo : Railway)
चाकण : भारतीय रेल्वे हे असे एक माध्यम आहे, ज्यातून सर्वाधिक प्रवासी नेण्याची क्षमता असते. आता हीच भारतीय रेल्वे चक्क दुसऱ्याच्या खांद्यावर बसून पुण्याहून नाशिकला निघाली, तेही रस्त्याने. पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटावरील घुमटकर पेट्रोल पंपासमोर हे चित्र पाहायला मिळाले. याने परिसरात एकच चर्चा सुरु झाली.
पुणे-नाशिक या महामार्गावर फक्त डांबरी रस्त्यावरून धावणारीच वाहनेच आढळून येत असतात. पण आता चक्क रेल्वेच या रस्त्यावरून धावते की काय याचा भास मात्र जाणवल्याशिवाय राहिला नाही. वेळ प्रत्येकावर येते ही म्हण काय खोटी नाही याचाही प्रत्यय यानिमित्ताने येतो. दररोज हजारो प्रवाशांना आपल्या खांद्यावर घेऊन इच्छितस्थळी पोहोचून प्रवाशांना सुरक्षित, आरामदायक, शिवाय आनंददायक अनुभव देणारी रेल्वे आज आपले स्थान टिकवून आहे. बदलत्या काळानुसार आज अनेक वाहनांचा शोध लागतो, पण तरीही सर्वात सुरक्षित प्रवास म्हटले की रेल्वेचीच आठवण आल्याशिवाय राहत नाही.
हेदेखील वाचा : गर्भाशय काढल्यानंतर मासिक पाळी येते का? जाणून घ्या मासिक पाळीचा आरोग्यावर होणारा परिणाम
भारतीय रेल्वेतून सर्व स्तरातील प्रवाशांसाठी अगदी सामान्य घरातील ते श्रीमंतांपर्यंत लोकही या रेल्वेला प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळेच या भारतीय रेल्वेचा एकमेव साधन म्हणून प्रथम क्रमांक आहे आणि म्हणून संपूर्ण भारतात सर्वात जास्त प्रवाशी वाहतूक रेल्वेनेच होते, यावर कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. असे असताना पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटावरील घुमटकर पेट्रोल पंपासमोर ही रेल्वे दिसून आली आहे.
भारतीय रेल्वे ही भारताची लाईफलाईन
भारतीय रेल्वे ही भारताची लाईफलाईन आहे. कुठेही प्रावस करायचा असेल तर पहिलं प्राधान्य भारतीय रेल्वेला दिलं जातं. कमी पैशात आणि अत्यंत वेगाने प्रवास करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे भारतीय रेल्वे आहे. पण आपल्याला रेल्वेचं तिकीट बुक करायचं असेल किंवा प्लॅटफॉर्म पास खरेदी करायचा असेल किंवा ट्रेनच्या वेळापत्रकावर लक्ष ठेवायचं असो या सर्व कामांसाठी आपल्याला वेगवेगळ्या ॲप्सचा वापर करावा लागतो. मात्र, आता भारतीय रेल्वेच्या या सर्व सुविधा प्रवाशांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देता याव्यात यासाठी लवकरच एक नवीन ॲप लाँच केलं जाणार आहे, अशीही माहिती आहे.