मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll) मोठी चुरस निर्माण झाली आहे. तसेच क्षणाक्षणाला इथली परिस्थिती रंगतदार होत आहे. तसेच अनेक घडामोडी घडत आहेत. अंधेरी पूर्व मतदारसंघाचे (Andheri East Assembly) शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट व भाजपा मैदानात उतरले आहेत. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अनेक समस्यांना सामोरी जात तसेच न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर आज लटके यांचा नोकरीचा राजीनामा (Resign) पालिकेनं मंजूर केला. त्यानंतर त्यांनी मविआच्या नेत्यांसोबत अर्ज शुक्रवारी दाखल केला. यावेळी ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. तर भाजप-महायुतीचा उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी देखील शुक्रवारी उमेदवार अर्ज दाखल केला. ३ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती करणारे पत्र (Letter) लिहलं आहे.
[read_also content=”प्रथिने, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12 ऑक्सिजनइतकेच आहेत महत्त्वाचे , जाणून घ्या कोणत्या पदार्थातून मिळतील हे पोषक घटक ? https://www.navarashtra.com/india/protein-vitamin-d-vitamin-b12-are-as-important-as-oxygen-nrab-336673.html”]
दरम्यान, या पत्रात राज यांनी म्हटलं की, प्रिय मित्र देवेंद्र, भाजपने अंधेरीची पोटनिवडणूक (Andheri Bypoll Election) लढवू नये. स्व. आमदार रमेश लटके यांना तीच खरी श्रद्धांजली असेल, अशा आशयाचं पत्र राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांना लिहिलं आहे. स्वर्गीय रमेश लटके यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्याने रमेश ह्यांच्या आत्म्यास खरी शांती मिळेल, असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलंय.
आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका.@Dev_Fadnavis pic.twitter.com/78nfA21hDP
— Raj Thackeray (@RajThackeray) October 16, 2022
मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजली अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे की, आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल, असं पत्रात राज ठाकरे यांनी भावनिक विनंती फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळं राज ठाकरे यांच्या विनंती पत्रानंतर देवेंद्र फडणवीस कोणता निर्णय घेतात याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.