भारतरत्न पुरस्कार विजेत्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज (6 फेब्रुवारी) पहिली पुण्यतिथी आहे. लता दीदींच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त अनेकांनी अभिवादन केलं आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक ट्वीट शेअर करुन लता मंगेशकर यांना अभिवादन केलं आहे.
…लता दीदींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.#LataMangeshkar #LataDidi pic.twitter.com/QYN3aDCWkR
— Raj Thackeray (@RajThackeray) February 6, 2023
राज ठाकरे यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “दीदींच्या निधनाला आज एक वर्ष झालं. मागच्या वर्षी नेमक्या ह्याच दिवशी, माझ्यासकट देशातील लाखो, करोडो लोकांना काहीतरी तुटल्याची भावना जाणवली. आणि ही भावना पुढे काही काळ मनात घर करून होती. पण काही काळाने दीदींचं गाणं पुन्हा कानावर पडलं आणि एक जाणवलं की मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरूपातील दीदी कायम राहणार. माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल, पण ह्यापुढे कदाचित अनेक पिढ्यांना सुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आलं तरी तो तितकाच आत ओढत राहील, शांत करत राहील. चिरंजीवी होणं म्हणजे काय असं मला विचारलं तर मी ह्यालाच चिरंजीवित्व म्हणेन. दीदींच्या आठवणी आहेत, राहतील पण त्याहून अधिक खोल त्या माझ्यासकट करोडो लोकांच्या जाणिवांमध्ये राहतील. दीदींच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन !”
The voice of the universe, returned to the universe a year ago. #LataMangeshkar ji ?? pic.twitter.com/t4MVEYZWWv
— VISHAL DADLANI (@VishalDadlani) February 6, 2023
राज ठाकरे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आणि राजकीय नेत्यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.शरद पवार यांनीही लता मंगेशकरांच्या स्मृतीदिनानिमित्त ट्विट केलं आहे.
लता दीदींनी आपल्या सुमधूर स्वरांनी भारतीय संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेले. त्यांचे अलौकीक सूर आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. संगीतविश्वातील त्यांचे योगदान भावी पिढीला नेहमीच प्रेरणा देत राहील. स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना प्रथम स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! pic.twitter.com/GuyA35YRmc
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 6, 2023
संगीत दिग्दर्शक विशाल ददलानी यांनीही लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे.
भारत रत्न आदरणीय लता मंगेशकर जी के प्रथम स्मृति दिवस पर उन्हें सादर अभिवादन। #LataMangeshkar pic.twitter.com/e8DdMAf4yo
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 6, 2023
नितीन गडकरी यांनी देखील ट्विटरवर ट्वीट शेअर करुन लता दीदींच्या स्मृतीस अभिवादन केलं.
गानकोकिळा, भारतरत्न लतादीदी मंगेशकर वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी आपल्यातून निघून गेल्या आणि संगीत विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली.
आज त्यांचा पहिला स्मृतिदिन
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ? pic.twitter.com/vJrw3Ieg87— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 6, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लतादिदींच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे.