कर वसुलीच्या बाबतीत सध्या राजापूर नगर परिषद ॲक्शन मोडवर आली आहे. ज्या मालमत्ता दारकांनी सन २०२३ – २४ चे विविध कर अद्यापही भरलेले नाहीत. त्यानी पुढील १५ दिवसांत कर न भरल्यास त्यांच्या नावाची यादी जाहीर रित्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्याचा इशारा दिला आहे.
राजापूर नगरपरिषद ही क वर्ग नगरपरिषद असून राजापूर नगरपरिषदेचे उत्पन्न हे या विविध करांवर अवलंबुन आहे. त्यातच शहरातील अनेक शासकीय कार्यालयांसहीत नागरिक वेळेत कर भरना करत नसल्याने या करांच्या वसुलीवर राजापूर नगर परिषदेला जास्त खर्च करावा लागत असल्याची माहिती राजापूर नगर परिषदेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांनी दिली आहे.
राजापूर शहर कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारक, पाणीपट्टीधारक, गाळा भाडे, इमारत भाडे याचे मिळकतदार व भोगवटादार यानी आपले चालू कर व थकबाकी आर्थिक वर्ष संपत आल्याने पुढील १५ दिवसात भरणा करण्याची सूचना एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. ज्या ज्या मालमत्ताधारकांची मालमत्ता कर, पाणीपट्टी, गाळाभाडे, इमारत भाडे असे सर्व कर थकबाकीसह भरावयाचे आहेत. त्यांनी पुढील १५ दिवसात ते कर भरुन राजापूर नगरपरिषदेला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. जे नागरिक नगरपरिषदेचे कर वेळेत भरणार नाहीत त्यांची नवे नोटीस बोर्डवर लावण्याचा इशाराही राजापूर नगर परिषदेने दिला आहे.