कल्याण: डोंबिवलीला (Dombivali) लागून असलेल्या ठाकुर्ली खाडी किनारा परिसरात भर दिवसा एक भयानक प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर पोलीस असल्याचे सांगून दोघांनी बलात्कार (Rape) केल्याची घटना समोर आली आहे. विष्णूनगर पोलिसांनी (Vishnunagar Police Station) या प्रकरणी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे.
[read_also content=”बॉयकॉटचा फायदा झालाय का ‘पठाण’ला? वीकेंडचा वार आणि 400 कोटी होणार का पार ? दाक्षिणात्य सिनेमांची सद्दी संपवणार का किंग खान ? https://www.navarashtra.com/movies/pathaan-box-office-collection-will-be-more-than-400-crore-very-soon-nrsr-365122.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी चार वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपल्या एका मित्रासोबत ठाकुर्ली खाडी किनारा परिसरात फिरायला गेली होती. ते दोघे फिरत असताना तिथे अन्य दोघेजण आले. दोघांनी तरुणी आणि तिच्या मित्राला आपण पोलीस असल्याचे सांगितले. तुम्ही या ठिकाणी आलात आता तुमच्याबद्दल तुमच्या पालकांना सांगिणार, असं त्यांनी म्हटलं. त्यापैकी एक जण पीडित तरुणीला काही अंतरावर घेऊन गेला. दुसरा आरोपी तरुणीच्या मित्राला घेऊन स्टेशन परिसरात आला. त्याने सांगितले की आमचे साहेब त्या ठिकाणी बसले आहे तू चल त्यांच्याशी बोल.
त्याचवेळी पहिल्या आरोपीने मुलीवर बलात्कार केला. नंतर दुसरा आरोपी मुलीच्या मित्राला सोडून त्या ठिकाणी आला आणि त्याने देखील मुलीवर बलात्कार केला. घडला प्रकार पीडित तरुणीने आपला नातेवाईकांना सांगितला. आधी हा प्रकार डोंबिवली जीआरपीकडे गेला मात्र घडला प्रकार हा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. त्यामुळे पीडित तरुणीला डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. विष्णुनगर पोलिसांनी रात्री बाराच्या सुमारास या प्रकरणात गुन्हा दाखल केला.
सध्या विष्णू नगर पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी पाच पथके तयार केली आहेत. पोलीस आरोपीच्या शोधात आहेत. पीडित तरुणी बारावीमध्ये शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे डोंबिवली एकच खळबळ उडाली आली आहे. तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या हा भयानक बलात्काराचा प्रकार घडल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबतीत आता पोलीस किती वेगाने पावले उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.