चिपळूणमध्ये क्यूआरद्वारे १३ लाखांची फसवणूक (फोत- istockphoto)
चिपळूणमध्ये दोन ज्वेलरी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
पोलिस ठाण्यात दाखल झाला गुन्हा
ग्राहकांमध्ये उडाली मोठी खळबळ
चिपळूण: शहरातील नक्षत्र फॉमग ज्वेलरी येथे खासगी बिल बुक तयार करून व स्वतःचा क्यूआर कोड वापरून ग्राहकांकडून पैसे स्वतःच्या खात्यात जमा करून तब्बल १३ लाख १६ हजार ५८७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शहरातील व्यापारी व ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सन २०२२ ते १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत चिपळूण येथील नक्षत्र फॉमग ज्वेलरी या दुकानात हा प्रकार घडला. या प्रकरणी महेंद्र मधुकर शिंदे (वय ३३ वर्षे, व्यवसाय हेड मॅनेजर, रा. पात्रे कॉम्प्लेक्स, हेड पोस्ट ऑफिस समोर, रत्नागिरी) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या प्रकरणातील सुमित संजय शिंदे (रा. कोंडे, शिंदेवाडी, ता. चिपळूण) याने स्वतःचे खासगी बिल बुक तयार करून घेतले. त्या बिल चुकवर सिमयंती गणेश तांचीटकर हिच्या सह्या घेण्यात आल्या.
पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
त्यानंतर सुमित शिंदे नक्षत्र फॉमग ज्वेलरीच्या चिपळूण शाखेतील दागिन्यांचा माल ग्राहकांना या खासगी बिल बुकद्वारे विक्री केला. या प्रकारातून एकूण १३,१६,५८७ रुपये अपहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात सुमित संजय शिंदे व सिमयंती गणेश तांबीटकर या दोघांवरही गुन्हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आली आहे. सिद्धार्थ अनिल बोराडे (वय २०, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
Crime News: रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! दरोड्याचा कट उधळला; पळून आलेल्या मुलाची सुटका
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संतोष पाटील, पोलिस अंमलदार दिपक चव्हाण, सचिन जाधव, प्रमोद मोहिते व त्यांच्या पथकाने केली आहे.






