रत्नागिरीट भाजपला धक बसणार? (फोटो- सोशल मीडिया)
निवडणुकीत डावलले जात असल्याची नाराजी कायम
राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर
पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मागणीला ठेंगा
राजापूर: नुकत्याच पार पडलेल्या राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीपासुन राजापूर भाजपामध्ये असणारी खदखद आता जिल्हा परिषद, पंचायत समीतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर आणखीनच वाढलेली असून अनेक भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपाला अखेरचा रामराम करण्याच्या तयारीला लागल्याने राजापूरात भाजपाची नाव बुडण्याची शक्यता राजकिय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकत्यांच्या निवडणुका असतात से वरिष्ठ नेते सांगत असले तरी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांना मात्र विचारात घेतल जात नाही. गेली अनेक वर्ष इमाने इतबारे पक्षाचे काम करूनही महायुती म्हणून भाजपाच्या वाट्याला जर एकही जागा येणाक नसेल तर कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी फक्त काय पक्षाच्या सतरंज्याच उचलायच्या का? असा खडा सवाल भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमधुन आता उघडपणेो विचारण्यात येत आहे.
वरिष्ठ पदाधिकारीही नाकारताहेत अस्तित्व
मात्र जिल्हा परिषद पंचायत समीत्यांच्या निवडणुका जाहीर होताच, पुन्हा राजापूरात भाजपाच्या पादाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मागणीला ठेंगा दाखवला जात आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघात सध्यस्थितीत भाजपाचे काही वरिष्ठ पदाधिकारीही भाजपाचे अस्तित्व नाकारत असून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपाला एखाद दुसऱ्या उमेदवारीवर समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे राजापूर भाजपामध्ये अंतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणावर असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षानी युतीचा धर्म पाळला नसतानाही, खासदार नारायण राणेंना राजापूर विधानसभा मतदार संधातून सुमारे ५४ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी असणारे भाजपाचे अस्तित्व मान्य करणारे भाजपाचे वरिष्ठ नेते आता कार्यकत्यांच्या निवडणुकीत हे का मान्य करत नाहीत?, असा खडा सवाल कार्यकत्यांमधून विचारण्यात येते आहे.
Bjp Politics : भाजपने 42 नगरसेवकांना दाखविला घरचा रस्ता; अनेकांची बंडखोरी
पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मागणीला ठेंगा
राजापूर नगर परिषद निवडणुकीतही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यानी आपल्या कार्यकर्त्यांचा अजिबात विचार केला नसल्याची खंत मनात असताना आता पुन्हा जिल्हा परिषद व पंचायत समीतीच्या निवडणुकीतही युती म्हणून भाजपाच्या वाट्याला भौषकाय असल्याची बाब कार्यकत्र्यान्मधूनः व्यक्त होत आहे राजापुर नगर परिषदेच्या निवडणुकीत काही भाजपाच्या पदाधिकाऱ्यानी जिल्हा परिषद पंचायत समीतीच्या उमेदवारीवर डोळा ठेवून व वरिष्ठाच्या शब्दावर विश्वास ठेवून सर्वसामान्य कार्यकत्र्याच्या तोंडाला पाने पुसली होती.
Mumbai: कांदिवलीत धावत्या डबल डेकर बसला अचानक भीषण आग, प्रवाशांनी उड्या मारून वाचवला जीव
अशा दुटप्पी नेत्यांच्या पक्षामध्ये न राहिलेले बरे…
भाजपाच्या वरिष्ठांच्या या दुटप्पी भुमीकेमुळे भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकत्यान्मध्ये नाराजी असून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तोंडावर राजापूर भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






