देवरुखमध्ये कोणाची सत्ता येणार? (फोटो- टीम नवराष्ट्र)
तिसऱ्या पंचवार्षित निवडणुकीत होणार चुरस
राजकीय स्थित्यंतरामुळे बदलली अनेक समीकरणे
नगराध्यक्षपदासाठी प्रत्येकाचा उमेदवार असण्याची शक्यता
सचिन मोहिते/देवरुख: निवडणुकीचे वारे आता घोंगाऊ लागले असून राजकिय पक्षांकडुन मोर्चे बांधणी वेगाने सुरु आहे. देवरुख नगरपंचायतीवर तसेच पंचायत समितीच्या सभापतीपदी देखील महिलाच राखीव असल्याने संगमेश्वर तालुक्यावर महिलाराज येणार आहे. मात्र गेल्या अडीच वर्षातील राजकिय उलथा पालथी पाहता यावेळी देवरुख नगरपंचायतीवर भाजपला सत्ता टिकविण्यात यश येणार कि महायुती की महाविकास आघाडीची सत्ता काबीज करणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. सत्ता परिवर्तन व्हावे अशी अनेकांची भुमिका दिसुन येत आहे. तालुक्यातील देवरुख या नगरपंचायतीची ही तिसरी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत झाल्यानंतर २०१३ ला पहिली निवडणुक झाली.
सेना भाजपा युतीत दुही
अडीच वर्षाच्या कार्यकाळात भाजप शिवसेना युतीची सत्ता होती यात सव्वा सव्वा वर्षाच्या कार्यकालात प्रथम नगराध्यक्ष नीलम हेगशेटचे त्यानंतर स्वाती राजवाडे झाल्या. अडीच वर्षांनंतर सेना भाजप युतीमध्ये दुही निर्माण झाली आणि अपहरण नाट्य सारखे प्रकार होऊन भाजप आणि राष्ट्रवादी यांनी मोट बांधत अडीच वर्षांकरिता निलेश भुरवणे यांच्या गळ्यामध्ये नगराध्यक्ष पदाची माळ पडली होती.
Maharashtra Politics: लेकीसाठी बापाचा त्याग! ‘या’ कारणासाठी नेत्याने दिला पदाचा राजीनामा
राजकीय स्थित्यंतरामुळे बदलली अनेक समीकरणे
गेल्या काही वर्षात राजकीय स्थित्यंतरामुळे अनेक समीकरणे बदललेली आहे. गत पाच वर्षीं ओबीसी महिला तर आता सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडल्यामुळे देवरुख नगरपंचायतीवर पुन्हा एकदा महिलाराज येणार आहे. यामुळे गेली काही वर्ष नगराध्यक्ष पदाची स्वप्ने पाहणाऱ्या अनेकांची निराशा झाली आहे.
नगराध्यक्षपदासाठी प्रत्येकाचा उमेदवार
सध्या देवरुखात भाजप, उद्धवसेना, शिंदे सेना राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट असे कार्यरत असुन बेट नगराध्यक्ष पदाकरिता प्रत्येकाने आपला उमेदवार देण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. अजुन तरी आघाडी, युती कि विकास पॅनेल असे चित्र स्पष्ट नसल्याने निवडणुक दुरंगी, तिरंगी, चौरंगी होणार हे सध्या तरी सांगता येणार नाही. मात्र उध्दव सेनेच्या पदाधिकार्यांनी तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सत्ता काबीज करण्यासाठी व्युहरचना तयार केली आहे. जनतेने गेल्या तीन वर्षात शहरातील खड्चाच्या समस्येचा सामना केला आहे. अनेकांमधुन सत्ता परिवर्तन हवे असल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra Politics: कोकणात महायुती डळमळणार; ‘या’ नगरपरिषदेसाठी भाजप स्वबळाचा नारा देणार?
दुसऱ्या निवडणुकीत भाजपाचा नगराध्यक्ष
तर दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपने थेट नगराध्यक्षपदी मुसंडी मारत पाच वर्षे निर्विवाद सत्ता संपादन केली होती. नगरसेवकांच्या संख्या बळाचा विचार करता त्यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि भाजप व मनसे यांची समान संख्या होती. मात्र तरीही भाजपने किमया करत थेट नगराध्यक्ष पदी विजय प्राप्त केला होता. यावेळी भाजपचे ७ नगरसेवक निवडून आले होते. मनसे १, अपक्ष १. शिवसेना ४ आणि राष्ट्रवादीचे ४ असे पक्षीय बलाबल होते. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये भाजपच्या मृणाल शेट्ये यांनी बाजी मारली.






