रघुवीर घाट (फोटो- istockphoto)
१४ गावांचा एक जीवनदुवा
रघुवीर घाटाचे खरे सौंदर्य पावसाळ्यातच खुलते, डोंगरांच्या कुशीतून कोसळणारे २७ हून अधिक नैसर्गिक धबधबे, सतत बरसणारा पाऊस, थंडगार वारे आणि दाट धुक्यात हरवलेली निसर्गरम्य वाट प्रत्येक क्षण अविस्मरणीय बनवते. फेसाळणाऱ्या धबधब्यांच्या सान्निध्यात चिंब भिजण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. त्यामुळेच दरवर्षी हजारो पर्यटक या घाटाकडे आकर्षित होतात. रघुवीर घाट हा केवळ पर्यटनस्थळ नाही, तर कांदोटी खोऱ्यातील शिंदी, वळवण, उचाट, चकदेव, बन, निवळी, वाघावळे, म्हाळुंगे, सालोशी, कांदाट, अकल्पे, मोरणी अशा १४ गावांचा जीवनदुवा आहे.
अत्यंत महत्त्वाचा मार्ग
महाबळेश्वर तालुक्याशी जोडणारा हा माम स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र यंदाच्या मुसळधार पावसाने या निसर्गरम्य घाटालाही मोठा फटका बसला आहे. अनेका ठिकाणी दरडी कोसळल्या असून रस्ते खचल आहेत. मोठमोठे दगड आणि मातीचा भराब रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक गावे सपर्कहीन झाली असून पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनान घाटातील पर्यटनाला १० ऑगस्टपर्यंत बंदी घातल आहे. रघुवीर घाटाचे सौंदर्य जितके मोहक तितकेच ते धोकादायकही आहे. मुसळधा पावसात दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याने या परिसरात सुरक्षिततेला सर्वोच् प्राधान्य दिले जात आहे.
Chiplun Flood News : अचानक वाढलेल्या वशिष्ठीच्या पाण्यात अडकले कुटुंब , एनरॉन परिसरातील थरार प्रसंग
रघुवीर घाट हा कोकणातील लोकप्रिय पावसाळी पर्यटनस्थळांपैकी एक असला तरी मानवी जीविताचे संरक्षण आणि नैसर्गिक आपत्ती टाळणे हेच प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे १० ऑगस्टपर्यंत पर्यटकांनी रघुवीर घाटात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






