पिंपरी : सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकाला 25 हजार रुपयांपेक्षा जास्त सदनिका हस्तांतरण शुल्क (फ्लॅट विक्री करताना सोसायटी जे शुल्क आकारते) आकारल्या प्रकरणी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अतिरिक्त शुल्क परत करण्याचे आदेश दिले आहेत.
रावेत येथील रॉयल कासा सोसायटीत अनिल दत्तू आटोळे यांनी 2018 साली फ्लॅट सोमनाथ गेनुभाऊ टेमकर यांना विकला.यावेळी टेमकर यांच्याकडून सोसायटी पदाधिकाऱ्यांनी सदनिका हस्तांतरण शुल्क म्हणून 50 हजार रुपये घेतले. मात्र नियमानुसार हे शुल्क 25 हजारांपेक्षा जास्त आकरता येत नाही. ही बाब लक्षात येताच आटोळे यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात धाव घेतली यावेळी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र यांनी सोसायटीचे पदाधिकाऱ्यांना अतिरीक्त आकारलेला रक्कम 25 हजार रुपये सोमनाथ टेमकर यांना परत करण्याचे आदेश दिले आहेत.