सांगली : सांगली लोकसभा मतदार संघात यावेळी महविकास आघाडीच्या जगावाटपात राजकारण झाल्याने काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असणारे विशाल पाटील यांना अपक्ष लढावे लागले. या लढाईत त्यांनी विजय मिळवला आहे. निवडणुकीपूर्वी त्यांना राज्यसभेची ऑफर होती. शिवाय आताही त्यांना एनडीए सोबत जाण्याचा मार्ग असताना त्यांनी मतदारांना दिलेला शब्द पाळण्यासाठी काँग्रेसला अधिकृत पाठींबा दिला आहे.
गुरुवारी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन त्यांनी इंडिया आघाडीत राहून काँग्रेस सोबतच राहण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत पाठींबा देणारे पत्र त्यांनी खर्गे यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री डॉ.विश्वजीत कदम उपस्थित होते.
यावेळी भावना व्यक्त करताना विशाल पाटील म्हणाले, “मी महाविकास आघाडीचा उमेदवार, यापुढे काँग्रेस पक्ष माझ्याबाबतीत काय निर्णय घेईल त्या धोरणानुसार माझी पुढील वाटचाल असेल. माझ्या बाबतीत काँग्रेस पक्ष काय निर्णय घेईल त्याच्याशी मी बांधील असणार आहे. माझ्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी काम केले त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. अँड प्रकाश आंबेडकर, विलासराव जगताप अजीतराव घोरपडे, जयश्री पाटील यांच्यासह अनिल बाबर यांचे कार्यकर्ते, विटा व मिरजेतील नगरसेवक यांच्यासह सर्वच पक्षाने माझ्यासाठी प्रयत्न केला आहे. त्याचे मी आभारी आहे.” असे मत सांगली लोकसभेचे खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केले.
Web Title: Sangli mp vishal patil along with congress sent a letter of support to congress president mallikarjun kharge loksabha elections nrpm