मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेचा (Rajyasabha Election) उमेदवार आणि संभाजीराजे (Sambhaji raje) हा विषय आता आमच्यासाठी संपला आहे. शिवसेना शिवसेनेच्या धोरणाप्रमाणेच वागली, असं प्रत्युत्तर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलं आहे.
[read_also content=”केंद्रीय मंत्री नारायण राणे लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल, अँजिओप्लास्टीच्या शस्त्रक्रियेनंतर प्रकृती स्थिर https://www.navarashtra.com/maharashtra/central-minister-narayan-rane-admitted-to-hospital-nrsr-285445.html”]
छत्रपती संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यसभेच्या निवडणुकीतून (Rajyasabha Election) माघार घेतली. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक लढवण्याची संभाजीराजेंची इच्छा होती. यासाठी त्यांना सर्वपक्षांचा पाठिंबा हवा होता. मात्र शिवसेनेत आलात तरच पाठिंबा मिळेल आणि शिवसेनेकडून उमेदवारीही मिळेल, अशी अट शिवसेनेनं घातली होती. संभाजीराजेंनी शिवसेनेचा हा प्रस्ताव फेटाळून लावल्यामुळे शिवसेनेनं देखील संभाजीराजेंना पाठींबा न देता दुसरा उमेदवार उभा केला. उद्धव ठाकरेंनी आपल्याला पाठिंबा देण्याचा शब्द दिला असताना तो पाळला नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली. त्याला संजय राऊतांनी उत्तर दिलं.
शिवसेना शिवसेनेच्या धोरणांनुसार वागली. संभाजीराजेंविषयी आम्हाला प्रेम आहे. मात्र संभाजीराजे आणि राज्यसभेची सहावी जागा हा विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्हाला शब्दाला शब्द लावून वाद वाढवायचा नाहीये. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. ही निवडणूक जिंकण्याची क्षमता महाविकास आघाडीत आहे, असे संजय राऊत म्हणाले.
उद्या छत्रपतींना परत राज्यसभेत यायचं असेल तरी त्यांना कोणत्या पक्षाचा आधार घ्यावेच लागेल. लोकसभा विधानसभाही लढायची असली तरीही त्यांना पक्षाचा आधार घ्यावाच लागणार आहे, असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलंय.