कुडाळ : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना रात्री ईडीने (ED) अटक केली. त्यांना जामिन मिळणार की ईडी कोठडीतला मुक्काम वाढणार, हे आज स्पष्ट होणार आहे. पत्राचाळप्रकरणी (Patra Chawl Case) संजय राऊतांना मध्यरात्री अटक (Arrest) करण्यात आली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी, महाराष्ट्राचा आवाज दाबण्यासाठी हे सर्व सुरु आहे. संजय राऊतांची अटक हे कटकारस्थान आहे, असे म्हटले आहे.
संजय राऊत यांच्या अटकेमुळे शिवसेनेला हादरा बसला असताना आदित्य ठाकरे यांनी आज तळकोकणातून शिवसंवाद यात्रेच्या (Shivsanwad Yatra) दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली. केसरकर यांच्या सावंतवाडी (Sawantwadi) मतदारसंघात दुपारी शिवसेनेचा मेळावा होणार आहे. केसरकरांनी केलेल्या टीकेला आदित्य ठाकरे काय उत्तर देणार याची उत्सुकता आहे. याशिवाय राणे पिता-पुत्रांवर आदित्य ठाकरे टीका करणार, याबाबतही चर्चा आहे. तर, संध्याकाळी आदित्य ठाकरे यांचा कोल्हापुरात (Kolhapur) मेळावा आहे.