साताऱ्यात २३३ जागांसाठी मतदान पूर्ण; पण मतमोजणी पुढे ढकलल्याने वाढला सस्पेन्स
‘नगराध्यक्षपदासाठी मी फॉर्म भरू शकलो नाही याची नाराजी’; उदयनराजेंची मिश्किल टोलेबाजी
सातारा जिल्ह्यात फलटण, महाबळेश्वर, कराडमधील प्रभाग क्रमांक एक व मलकापूर नगरपरिषदेच्या दोन जागेवरील निवडणुकीला राज्य शासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे ३७४ मतदान केंद्रांवर मंगळवारी दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसातपासून शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दोन तासांमध्ये जिल्ह्यामध्ये सरासरी १२ टक्के मतदानाची नोंद झाली. वातावरणात गारवा होता तरीसुद्धा नागरिकांच्या जिल्ह्यात मतदानासाठी उत्साहाने रांगा दिसून आल्या. तब्बल नऊ वर्षांनी नगरपालिका निवडणूक होत असल्यामुळे मतदान प्रक्रियेमध्ये प्रचंड उत्साह होता.
जिल्ह्यात २३५४ कर्मचारी व ५४ अधिकारी नेमण्यात आले होते. ३७४ मतदान केंद्रांवर सुमारे साडेचारशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तीन लाख २८ हजार ४३५ मतदारांपैकी महिला मतदारएक लाख ६५ हजार १२, तर पुरुष मतदार एक लाख ६३ हजार ३७१ इतके आहेत. दुपारी बारापर्यंत सर्वाधिक मतदानाची नोंद मेढा येथे ५६ टक्के इतकी नोंदवण्यात आली. दीड वाजता प्रशासनाने आढावा घेतला असता पाचगणी येथे २७.३१, सातारा येथे ३१.४३, मलकापूर येथे ३९.१०, म्हसवड येथे ३९.५८, वाई येथे ३६.३४, कराड येथे ३४.८८, रहिमतपूर येथे ४८.५८ तर मेढा येथे ५९.२६ इतके मतदान झाले होते. पोलिस अधीक्षक तुषार दोशी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला.
बिहारनंतर पश्चिम बंगालसह ‘या’ राज्यांत होणार निवडणुका; अमित शहांकडे येणार मोठी जबाबदारी
कराडमध्ये सुद्धा काही ठिकाणी दोन गटांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादावादी झाल्याच्या घटना घडल्या पाचगणी, महाबळेश्वर, रहिमतपूर, म्हसवड, वाई, मलकापूर येथे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा उत्साह दिसून आला, मेढा, मलकापूर, कराड येथे उत्साहात ६० टक्क्यापेक्षा अधिक मतदान झाले. त्यामुळे येथील कार्यकत्यांची राजकीय धाकधूक वाढली आहे. सातारा जिल्ह्यात सरासरी ६२.१४ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. आकडेवारीच्या सुसूत्रीकरणाच्या अभावामुळे जिल्हा प्रशासनाने या माहितीला दुजोरा दिला नाही.
प्रभाग क्रमांक तीन मध्ये सुद्धा रक्षक प्रतिष्ठानचे सुशील मोझार यांनी दोन अपक्ष उमेदवार उभे केले आहेत. तेथेही मतदार यादीत संबंधित मतदाराची नावे न सापडल्याने त्यानी आक्षेप घेतला. त्यामुळे सुद्धा तेथे मोठा गोंधळ उडाला.






