डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी SIT स्थापन करा; राष्ट्रवादी पक्षाची तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली (फोटो -सोशल मीडिया)
Satara Doctor Death Case: औंढा नागनाथ: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यामध्ये वातावरण तापले आहे. राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपींची हातावर नावे लिहिण्यात आली. यामधील आरोपी प्रशांत बनकर आणि गोपाल बदने यांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी नांदेडमध्ये राष्ट्रवादीने केली आहे.
डॉ. संपदा श्रीकिशन मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करून उच्चस्तरीय आय पी एस महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करून या प्रकरणाश संलग्न दोषी असणाऱ्या आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करणे आणि योग्य ती चौकशी करून मुंडे कुटुंबाला न्याय द्यावा या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन दिले आहेत. निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. सदरील निवेदन नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांन स्वीकारले. डॉ. संपदा श्रीकिशन मुंडे यांची हत्या फलटण जि. सातारा येथे झालेली आहे. या प्रकरणाशी निगडीत असलेले खासदार रणजीतसिंग नाईक निंबाळकर व त्यांचे दो पि.ए जे डॉ. संपदा मुंडे यांना बेकायदेशीररित्या फिटनेस मेडिकल प्रमाणपत्र देणेबाबत सतत दबाव टाकत होते असा आरोप राष्ट्रवादीकडून केला जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आरोपीना फाशीची शिक्षा देण्यासाठी राष्ट्रवादीकडून निवेदन
आरोपींचे सर्व मोबाईलचे सी डी आर तपासावे, तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन डॉ संपदा मुंडे हयात नसताना यांच्या चारित्र्यावर संशय घेवून हनन केले. सदर प्रकरणात दोन आरोपी गोपाल बदने व प्रशांत बनकर अटक आहेत. या दोन्ही आरोपीचे सर्व मोबाईलचे सी डी आर तपासावे. तसेच खासदार रणजीतसिंग नाईक निंबाळकर व त्याचे दोन पी ए, रूपाली चाकणकर यांना या प्रकरणाशी निगडीत असलेल्या सर्वांना मुख्यमंत्री यांनी एस आयटी स्थापन करून या प्रकरणातील सातारा जिल्ह्यातील कोणताही पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्याऱ्यांना समाविष्ट न करता उच्चस्तरीय आयपीएस महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करून या प्रकरणाशी संलग्न दोषी असणाऱ्या आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करणे व योग्य ती चौकशी करून मुंढे कुटूंबाला न्याय देणे व सदरील प्रकरण फास्ट कोर्टामध्ये चालविण्यासाठी तसेच आरोपीना फाशीची शिक्षा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून निवेदन देण्यात आले आहे. वरील प्रकरणी तात्काळ योग्य ती कार्यवाही करून मुंढे कुटूंबास न्याय मिळवून द्यावा, अन्यथा सात नोव्हेंबरला जिंतूर टी पॉइंट) औंढा नागनाथ जिंतूर छत्रपती संभाजी नगर रोडवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाव्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
निवदेनावर अनेकांच्या स्वाक्षऱ्या
या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस औंढा तालुकाध्यक्ष रमेशराव सानप, संभाजी पाटील तालुका उपाध्यक्ष, विठ्ठलराव गायकवाड सरोचटणीस, बाळासाहेब मगर, पांडुरंग कुटे साहेबराव सानप, संतोष सांगळे, जगन्नाथ कागणे, नारायण खिल्लारे यांच्या स्वाक्षरी आहेत.






