मुंबई : दहा दिवसाचं राजकीय नाट्य अखेर संपल असून राज्याला नवे मुख्यमंत्री मिळाले आहे. मात्र यामुळे महाविकास आघाडीला चांगलाच धक्का बसला आहे. तसेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी केली. यावरुन शिंदे गट आक्रमक झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या या कारवाईनंतर शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंना नेतेपदावरुन हटवणं चुकीचं आहे. आम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं. शिवसेनेनं अशी कृती करायला नको होती. शिवसेनेची ही कृती लोकशाहीला शोभणारी नाही. आजही आमच्या हातात शिवबंधन आहे, असं म्हणत दीपक केसरकर यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे.
[read_also content=”सुरक्षारक्षक आणि ग्रीन मार्शल पथकात तृतीयपंथीयांचा समावेश; आयुक्तांच्या हस्ते दिले नेमणूकीचे पत्र https://www.navarashtra.com/maharashtra/security-guards-and-green-marshal-squads-include-third-parties-letter-of-appointment-given-by-the-commissioner-nrdm-299671.html”]
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं आणि ज्यांनी हे सरकार बनवंल शिवाय तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं ते म्हणत आहेत. मी त्यांना मागील अडीच वर्षापुर्वी हेच सांगत होतो की, आम्हाला अडीच वर्ष द्या. मात्र, त्यावेळी अमित शहा यांनी मला दिलेला शब्द पाळला नाही. जर त्यावेळी मला दिलेला शब्द पाळला असता तर काल जे घडलं ते सन्मानाने घडलं असतं. भाजप किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता. मात्र, त्यावेळी भाजपने का नकार दिला हा माझ्यासह जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे. दरम्यान, पाठित वार करुन शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला असं ते म्हणत आहेत. पण, शिवसेनेला बाजूला ठेवून सेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. असं म्हणत त्यांनी बंडखोरांना आणि मुख्यमंत्र्यांना सुनावलं.