मुंबई – आज स्वर्गीय हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा १० वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने राज्यभरातील शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे दाखल झाला आहे. दरम्यान, सत्तांतरानंतर व शिवसेनेतील फूटीनंतर बाळासाहेबांचा पहिलाच आज स्मृतीदीन आहे. आज कोणताही वाद किंवा संघर्ष होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त काल (बुधवारी) सायंकाळी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाच्या येथे जाऊन अभिवादन केले. यावेळी शिंदे गटातील अनेक आमदार व मंत्री उपस्थित होते. मात्र, शिंदे गटाचे (Shinde Group) अभिवादन झाल्यानंतर ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाच्या येथे जाऊन गोमूत्र शिंपडले. दरम्यान, यावरून आता वाद पेटण्याची शक्यता आहे.
[read_also content=”विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ‘ऊस तोडणी बंद’ आंदोलन https://www.navarashtra.com/maharashtra/sugarcane-cutting-stop-from-swabhimani-shetkari-strike-in-state-345658.html”]
दरम्यान, शिंदे गटाने काल बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर, ठाकरे गटातील (Thackeray Group) पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाच्या येथे जाऊन गोमूत्र शिंपडले. यावरुन शिंदे गट आक्रमक झाला असून, ठाकरे गटातील पदाधिकारी यांच्या विरोधात शिंदे गटाने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच तक्रारीत विशाखा राऊत, मिलिंद वैद्य, महेश सावंत, खासदार अरविंद सावंत यांचाही उल्लेख या करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमदार व मंत्री यांनी बुधवारी (१६ नोव्हेंबर) रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवाद करत आदरांजली वाहिली होती. मात्र, त्यानंतर काही वेळाने ठाकरे गटाने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्री तसेच, आमदार यांचा हेतूपुरस्सर अपमान केले असल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे, असा उल्लखे तक्रारीत केला आहे.