Shivaji Maharaj Jayanti: राज्यात शिवजयंतीचा मोठा उत्सव ; शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींकडून पदयात्रा
Shivaji Maharaj Jayanti:महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त रत्नागिरी, ठाणे आणि अहिल्यानगर अशा राज्याच्या विविध कानाकोपऱ्यात शिवजयंती निमित्ताने शिवप्रेमींनी पदयात्रेचं आयोजन केलं आहे. रात्नागिरीत येथे मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ते पेठकिल्ला शिवसृष्टी अशी या रॅलीची मार्गक्रमणा होती. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांतअधिकारी जीवन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.रत्नागिरीत सकाळी मारुती मंदिर शिवाजी स्टेडियम ते संपूर्ण शहरांमध्ये शिवजयंती निमित्त पदयात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, अधिकारी, तसेच नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या विद्यार्थी, स्काऊट गाईड तसेच वेगवेगळे संस्था देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या दिसत होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित “जय शिवाजी जय भारत पदयात्रा” ठाणे शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) हरिश्चंद्र पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहिल्यानगरमध्ये देखील मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. मराठा प्रसारक विद्यालयाच्या वतीने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकित पारंपरिक वेशात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या, तर अनेक लेजीम आणि ढोल पथके नागरिकांसाठी आकर्षण ठरली आहेत. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. शहरातील माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून या मिरवणुकीला सुरवात झाली होती. त्याचबरोबर शहरातील ठीक ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्यात आली त्यामुळे शहरातील वातावरण शिवमय झाल्याचे पाहयला मिळाले. त्याचबरोबर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि आमदार संग्राम जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शासकीय शिवजयंती साजरी केली. यावेळी महापुरुषांबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीविरोधात कायदा करून धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे.