रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये आज २५ ऑगस्ट रोजी सकाळी दोन एसटींचा अपघात झाला आहे. दोन एसटींची (ST Bus) समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला असून या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले आहेत. तर यात एक बस चालक गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल केले आहे.
अपघात झालेल्या दोन एसटी बस पैकी एका एसटीचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, आज सकाळी विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी एसटीने प्रवास करत होते. दापोली येथे दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात विद्यार्थी आणि महिला प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना सरकारी रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले असून त्यांच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.