अमळनेर बसस्थानकावर एसटी बस ऑनलाईन तिकीटाचा भोंगळ कारभार करते (फोटो - सोशल मीडिया)
अमळनेर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ (एमएसआरटीसी) अमळनेर आगारातील ऑनलाईन व्यवस्थेतील त्रुटीमुळे प्रवाशांना भोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे. अमळनेर छत्रपती संभाजीनगर या मार्गावरील बससेवेबाबत चौकशी विभागाकडे कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नसल्याने प्रवाशांना तब्बल तीन तासांहून अधिक काळ प्रतिक्षा करावी लागली.
अमळनेरचे रोटरी क्लब सचिव आशिष चौधरी यांनी यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल केलो की दुपारी साडे आकराच्या बससाठी दोन ऑनलाईन तिकिटे बुक केली होती. मात्र, स्थितीबातत (स्टेटस आणि ट्रैकिंग) कोणतीही माहिती चौकशी विभागाकडे उपलब्ध नव्हती. विचारणा केली असता गाडी येईल की नाही याची खात्री नाही असेच उत्तर मिळाले.
तक्रारवहीसुद्धा उपलब्ध नाही…!
यावर आणखी धक्कादायक बाब म्हणजे, चौकशी विभागात तक्रार नोंदवण्यासाठी विचारले असता “तक्रार वहीच उपलब्ध नाही” असे उत्तर मिळाले. प्रमुखांना संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी “पाच मिनिटांत येतो असे सांगूनही दीर्घकाळ अनुपस्थित राहिले. संपूर्ण जग ऑनलाईन व्यवस्थेकडे वळलेले असताना, महाराष्ट्र शासनाच्या एमएसआरटीसीसारख्या संस्थेकडे जीपीएस ट्रैकिंग किंवा प्रवासी माहिती प्रणाली नसणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. प्रवाशांना अचूक व वेळेवर माहिती मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे,” असे मत रोटरी क्लब अमळनेरचे सचिव आशिष चौधरी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाईन तिकीट पण ऑफलाईनची जास्त अडचण
अकरा ते एक वाजून पन्नास मिनिटांपर्यंत प्रवाशांनी प्रतिक्षा केल्यानंतर, तिकीट रद्द करण्यासाठी काउंटरवर गेल्यावर एक ते दोन लंच ब्रेक असल्यामुळे कामकाज पूर्णपणे बंद होते. परिणामी प्रवाशांना पर्यायी बस शोधून प्रवास करावा लागला. यानंतर माहिती मिळाली की साडेअकरा वाजताची बस दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी आली आणि परत गेली, अशी खेदजनक स्थिती होती. या काळात प्रवाशांना बसची कोणतीही माहिती स्क्रीन, फलक किंवा डिजिटल स्क्रॉलिंगवर देण्यात आली नव्हती.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रवाशांच्या असंतोषाचा उद्रेक…
घटनेच्या वेळी बसस्थानकावर उपस्थित इतर प्रवाशांनाही अशाच प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागले. काही प्रवाशानी ऑनलाईन बुकिंग असूनही बस “रद्द” झाल्याची माहिती मिळाल्याने संताप व्यक्त केला.
त्वरित सुधारणा करण्याची मागणी…
याप्रकरणी संबंधितानी तात्काळ चौकशी करून बस ट्रैकिंग व्यवस्था लागू करावी, प्रत्येक आगारात डिजिटल स्क्रोलिंग व ऑनलाईन अपडेट्स सुरू करावेत, तसेच तक्रार नोंदवही व ऑनलाईन हेल्पडेस्क सक्रीय करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.






