मुंबई : राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील सरकार बदलण्याची दाट शक्यता दिसत आहे. शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत. एकनाथ शिंदे तसेच त्यांचा बंडाळी गट उद्या मुंबईत दाखल होणार आहे. त्यामुळं एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात बैठकीचं (Shivsena, congress, and NCP Meeting) जोरदार सत्रं सुरु आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी मंगळवारी रात्री, राज्यपाल भगत सिंह कोशारी (Bhagat singh koshayri) यांची भेट घेत मविआला बहुमत सिद्ध कऱण्याची मागणी केली होती. याविरोधात शिवसेनेनं सर्वोच्य न्यायालयाच (Suoerme Court) याचिका दाखल केली असून, त्यावर लवकरत सुनावणी (hearing) पार पडणार आहे.
[read_also content=”‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…किशोर कदमांची राजकीय परिस्थितीवर उपरोधिक भाष्य करणारी कविता सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ https://www.navarashtra.com/maharashtra/kishor-kadam-poem-on-the-political-situation-spreads-on-social-media-298627.html”]
या पार्श्भूमीवर आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला (State Cabinet Meeting) सुरुवात झालेली आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीमधील मंत्री हजर झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित आहेत. ही राज्य मंत्रिमंडळाची मुख्यमंत्र्यांची तसेच महाविकास आघाडीची शेवटची बैठक ठरणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यामुळं आजच्या बैठकी विशेष आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके कोणकोणते निर्णय होतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार संकटात आले आहे. मंगळवारी देखील मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. त्यामुळे मागील २४ तासात राज्य मंत्रिमंडळाची ही दुसरी बैठक आहे. मुख्यमंत्री हे अनेक दिवसानंतर प्रत्यक्ष बैठकीसाठी मंत्रालयात उपस्थित राहिले आहेत. त्यामुळं मुख्यमंत्र्यांची ही शेवटची बैठक असणार का, यावर तर्कवितर्क आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.