नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी हिंगोलीमध्ये राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरु झाली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Local Body Elections 2025: हिंगोली : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याबाबत न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका घेण्याबाबत हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्या अनुषंगाने हिंगोलीत मतदार केंद्राची पाहणी अधिका-यांनी केली. मागील अनेक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका रखडल्या होत्या. न्यायालयाने जानेवारी २०२६ पर्यंत या निवडणुका घेण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्य निवडणुक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पालिका निवडणुका घेण्याबाबत हालचाली गतिमान केल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकाही घेण्यात आल्या आहेत. यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ मध्ये होणाऱ्या सावत्रिक निवडणूकांची अंतिम प्रभाग निहाय मतदार यादीही प्रकाशित करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे निवडणूककरीता मंडप, फर्निचर, विद्युत जोडणी, ध्वनीक्षेपण मंत्रणा, लेखन सामुग्री, विविध प्रकाराचे बाहने आदींबाबत जाहीर ई निविदाही काढण्यात आल्या आहेत. एकुणच परिस्थितीमध्ये न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार निवडणुका घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरु झाली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रमानुसार हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी आणि वसमत नगर पालिका आहेत. यासोबतच हिंगोली जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समित्यांची निवडणुक देखील घेण्यात येणार आहे. हिंगोली शहरामध्ये १७ प्रभाग -संख्या आहे. यासाठी ७९ मतदान केंद्र – सुसज्ज करण्याच्या दृष्टीने तसेच तेथील व्यवस्थेची पाहणी हिंगोलो नगर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, नगर अभियंता प्रतीक नाईक व स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांनी केली. मतदानाच्या दृष्टीकोणातून संपूर्ण बाबीची पाहणी या अधिकाऱ्यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
२०१६ पासून रखडलेल्या नगरपालिका निवडणुकांना अखेर मुहूर्त लाभला असून राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार असून २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमानुसार १० ते १७ नोव्हेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल होतील. १८ नोव्हेंबर रोजी छाननी तर २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत राहील. अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबर ही शेवटची तारीख असेल. २६ नोव्हेंबरला अंतिम यादी जाहीर होईल. या निवडणुकीत तिसऱ्यांदा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. प्रत्येक मतदाराला तीन मते दोन नगरसेवकांसाठी व एक नगराध्यक्षासाठी देता येतील. यामुळे यंदाची लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.






