शिवसेने विरुद्ध बंड पुकारुन टिकेचे धनी झालेल्या शिंदे गटाने थेट आत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. शिवसेनेने आमदारांवर केलेल्या अपात्रतेच्या कारवाईविरोधात शिंदे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची कोर्टात बाजू मांडण्यासाठी नामांकित वकील हरीश साळवे मैदानात उतरले आहेत. तर महाविकास आघाडीच्या बाजूने जेष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी आपली बाजू मांडणार आहे.
शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. यामुशे शिवसेना आता आक्रमक झाली असून बंडखोर आमदारांवक अपात्रतेची कारवाई करण्यात येत आहे. या कारवाई विरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात गेला आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील कोर्टात दाखल करण्यात आली आहे.
[read_also content=”“… तर शिवसेनेसाठी हातामध्ये दांडके घेऊन लढण्याची तयारी ” : शिवसेना तालुका प्रमुख संतोष सोळस्कर https://www.navarashtra.com/maharashtra/so-ready-to-fight-for-shiv-sena-with-sticks-in-hand-shiv-sena-taluka-chief-santosh-salaskar-nrab-297503.html”]
एकनाथ शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. आज या याचिकेवर सुनावणी होत असून न्यायालयाच्या या सुनावणीकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. एकनाथ शिंदे गटाला बजावण्यात आलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना शिंदे गटाने हायकोर्टात आव्हान दिले आहे. याबरोबरच अजय चौधरी यांच्या नियुक्तीला देखील शिंदे गटाने याचिकेद्वारे आव्हान देले आहे. शिवाय शिंदे गटाच्या आमदारांना पोलीस संरक्षण देण्याचीही याचिकेत मागणी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटातील दोन सदस्यांची याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
[read_also content=”चुकीच्या सल्लागारांमुळे शिवसेना अडचणीत, आता दिपक केसरकरांची टिका https://www.navarashtra.com/maharashtra/deepak-kesarkars-critzied-that-shiv-sena-in-trouble-due-to-wrong-advisors-neps-297500.html”]
शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेमार्फत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या बाजूनं कौल दिल्यामुळे त्यांच्या निर्णयाविरोधात थेट आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले या दोघांकडून दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.