आता माधुरी हत्तीचं पुढे काय होणार? सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण निर्णय (फोटो सौजन्य-X)
Madhuri Elephant case News In Marathi : कोल्हापूर जिल्ह्यातील नंदनी इथल्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीनी प्रकरणात सुनावणी घेण्याची अखेर सर्वोच्च न्यायालयाने दाखवली आहे. शुक्रवारी (१२ डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. राज्यातील या प्रकरणाचा निर्णय घेण्याचा अधिकार हाय पावर कमिटीकडे देण्यात आला आहे.
माधुरी हत्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. यासंदर्भात हाय पॅावर कमिटीकडे निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. वनतारा व शासन मिळून सर्व सुविधा नांदणी येथे उपलब्ध होणार. नांदणी मठाकडून हाय पॅावर कमिटीकडे सोमवारी हत्ती मागणीसाठी अर्ज सादर करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून माधुरी हत्तीसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या हत्तीणीबाबतचा निर्णय हाय पॅावर कमिटीकडे घेण्याचा अधिकार सोपवण्यात आला आहे. वनतारा व शासन मिळून सर्व सुविधा नांदणी येथे उपलब्ध होणार आहेत. नांदणी मठाकडून हाय पॅावर कमिटीकडे सोमवारी हत्ती मागणीसाठी अर्ज सादर करणार आहे.
महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला वनताराकडे सोपवण्यात आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. नागरिकांच्या निषेधानंतर, राज्य सरकार आणि मठाच्या वतीने न्यायालयीन याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी महिनाभराहून अधिक काळ झाली नाही. अखेर, याचिकाकर्त्याने पुन्हा प्रकरणाचा उल्लेख केल्यानंतर, न्यायालयाने सुनावणीची तारीख निश्चित केली आहे.
वनतारा व शासन मिळून नांदणी येथे हत्तीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मिळाली आहे. नांदणी मठाकडून सोमवारी हाय पावर कमिटीकडे ‘माधुरी’ हत्ती मिळवण्यासाठी अधिकृत अर्ज सादर केला जाणार आहे. या प्रकरणी सुनावणी करिता माजी खासदार राजू शेट्टी स्वत: सर्वोच्च न्यायालयात हजर राहिले होते. आज सर्वोच्च न्यायालयात राज्यातील दोन महत्वाच्या विषयांवर सुनावणी झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
२८ जुलै रोजी नंदनी मठातून ‘माधुरी हत्तीनी’ ला जामनगर येथील ‘वनताराच्या’ राधे कृष्ण टेंपल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टकडे सोपवण्यात आले होते. ‘माधुरी’ ला वनताराच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करताना नांदणीतील लोकांनी भावनिक निरोप दिला होता. तिची पाठवणी करताना नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्यानंतर गावागावातून मूकमोर्चे, ग्रामपंचायतीचे ठराव, गाव बंद, कँडल मार्च काढण्यात आले. जैन मठ आणि कोल्हापूरच्या जनतेच्या भावनांची दखल घेत वनताराने माधुरीसाठी नांदणी परिसरातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी दर्शवली आहे.