सर्वेक्षणात ड्रॅगनफ्लाय आणि डॅमसेल्फ्लाय या ओडोनाटा गटातील ज्ञात प्रजातींमध्ये ३५ टक्के घट झाल्याचे समोर आले (फोटो - टीम नवराष्ट्र)
Pune News : पुणे : सुनयना सोनवणे : पश्चिम घाटातील जैवविविधतेबाबत चिंताजनक वास्तव समोर आले आहे. एका सर्वेक्षणात ड्रॅगनफ्लाय (चतुर) आणि डॅमसेल्फ्लाय (टाचणी) या ओडोनाटा गटातील ज्ञात प्रजातींमध्ये तब्बल ३५ टक्के घट झाल्याचे आढळले आहे. पर्यावरणीय (Environment News) दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या कीटकांच्या विविधतेतील ही घट पश्चिम घाटातील गोड्या पाण्याच्या परिसंस्थेबाबत गंभीर परिणामांची सूचना देणारी ठरत आहे.
फेब्रुवारी २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीत महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गोवा आणि गुजरात या पाच राज्यांतील १४४ ठिकाणी हे व्यापक सर्वेक्षण करण्यात आले. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सुमारे १६०० किलोमीटरपर्यंत पसरलेल्या आणि जागतिक स्तरावर जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम घाटातील गोड्या पाण्यातील जैवविविधतेचे हे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे मूल्यांकन मानले जात आहे.
हे देखील वाचा : “भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी..; छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याने रोहित पवारांचा संताप अनावर
डॉ. पंकज कोपर्डे (सहाय्यक प्राध्यापक, एमआयटी-डब्ल्यूपीयू, पुणे), अराजुश पायरा (पीएचडी स्कॉलर), अमेय देशपांडे (एमएससी विद्यार्थी) आणि रेजी चंद्रन (सोसायटी फॉर ओडोनेट स्टडीज, केरळ) यांच्या संशोधन पथकाने नद्या, ओढे, धबधबे, तलाव, सरोवरे आणि धरणे अशा विविध गोड्या पाण्यातील अधिवासांमध्ये शिस्तबद्ध क्षेत्रीय अभ्यास केला.
या संशोधनात ओडोनाटाच्या १४३ प्रजातींची नोंद करण्यात आली. त्यामध्ये पश्चिम घाटासाठी वैशिष्ट्यपूर्ण अशा ४० प्रजातींचा समावेश आहे. मात्र, या प्रदेशात असलेल्या एकूण प्रजातींपैकी ही संख्या केवळ ६५ टक्के आहे. यामुळे अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त होत आहे.
ओडोनाटा प्रजाती पर्यावरणातील बदलांबाबत अत्यंत संवेदनशील असल्याने त्यांना ‘इंडिकेटर टॅक्सा’ म्हणजेच पर्यावरणीय सूचक मानले जाते. त्यांचे पुनरुत्पादन पूर्णपणे गोड्या पाण्याच्या परिसंस्थेवर अवलंबून असल्याने त्यांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती थेट जलस्रोतांच्या आरोग्याबाबत सूचक ठरते.
हे देखील वाचा : धीरेंद्र शास्त्री पुन्हा बरळला! छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्याने पेटला वाद
संशोधनात एलाटोनेउरा सौटेरी, प्रोटोस्टिक्टा सँग्विनोस्टिग्मा आणि सायक्लोगॉम्फस यप्सिलॉन या तीन प्रजाती ‘असुरक्षित’ श्रेणीत असल्याचे आढळले. तसेच बहुतेक प्रजाती आययूसीएन रेड लिस्टमध्ये ‘माहितीचा अभाव’ किंवा ‘मूल्यांकन न झालेली’ या श्रेणीत असल्याने वैज्ञानिक माहितीची कमतरता स्पष्ट झाली.
राज्यानुसार प्रजातींची संख्या






