फोटो - सोशल मीडिया
नाशिक : खासदार नारायण राणे व आमदार नितेश राणे हे नेहमी त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आमदार नितेश राणे हे प्रक्षोभक वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत आहे. रामगिरी महाराजांच्या बचावबाबत नितेश राणे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. यावेळी त्यांनी हातवारे करत बंदुकीतून गोळ्या झाडण्याचा इशारा देखील दिला. त्यांच्या या वागण्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. भाजप श्रेष्ठींकडे तक्रार करत नितेश राणे यांना समज देण्याची मागणी करत आहेत.
तू देखील जातीयवादी औलाद
आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्यावरुन राजकारण रंगले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी आमदार नितेश राणेंवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नितेश राणे यांना समज देण्याची मागणी केली आहे. तसेच शरद कोळी यांनी नितेश राणे यांचा एकेरी उल्लेख देखील केला आहे. शरद कोळी म्हणाले, “मशिदीकडे बघून गोळी झाडल्याचा इशारा करतोस, मात्र राज्यातील जनता तुझे हात कलम केल्याशिवाय राहणार नाही. नितेश राणे आणि त्याचा बाप दलाल असून स्वतःला गब्बर म्हणतोय. गब्बर हा लोकांवर अन्याय करणारा, लोकांच्या घरावर दरोडे टाकणारा होता त्यामुळे तू देखील जातीयवादी औलाद असून महाराष्ट्रावर दरोडा टाकतोय,” असा गंभीर शब्दांमध्ये शरद कोळी यांनी नितेश राणेंवर टीका केली आहे.
नित्या राणेचा बंदोबस्त करा, नाहीतर…
पुढे शरद कोळी म्हणाले की, “महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी तू दलाली घेतली आहेस. मराठा, मुस्लिम, ओबीसी विरोधात बोलून युवकांची माथी भडकवून राज्यात दंगल घडवण्याची दलाली घेतली आहेस. नित्या दलाली करायचे बंद कर अन्यथा गब्बरची जशी हालत झाली तशी तुझी होणार आहे. देवेंद्र फडणवीस या नित्या राणेचा बंदोबस्त करा, नाहीतर आमचं सरकार आल्यावर त्याची काय अवस्था केली जाईल ते बघा” असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी दिला. त्यांच्या या इशाऱ्यावर आता राणे कुटुंबीय काय प्रत्युत्तर देणार याची चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले होते नितेश राणे?
नाशिकमध्ये ठिकठिकाणी रामगिरी महाराजांनी मुस्लीम समजाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. सिन्नरच्या प्रवचनात सराला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांबद्दल आणि महिलांबाबत विधान केले. त्यांच्या या विधानांविरोधात मुस्लिम समाजाने ठिकठिकाणी मोर्चे काढले तसेच तक्रारी देखील दाखल केल्य. आता या मुद्द्यावरुन हिंदू समाजाकडून मोर्चे काढले जात असून अहमदनगरच्या मोर्चामध्ये आमदार नितेश राणेही सहभागी झाले होते. मात्र यावेळी “रामगिरी महाराजांनी सिन्नरमधील प्रवचणात जो मुद्दा मांडला तो सतत मांडत रहावा, संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे. जर रामगिरी महाराजांच्या विरोधात कोणी बोललं, कोणी मस्ती केली तर मशिदीत घुसून चून-चून के मारेंगे,” असे नितेश राणे म्हणाले.






