कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्याच्या दुभाजकामध्ये मोबाईल टॉवर उभारण्यास खाजगी टॉवर कंपनीला परवानगी दिली आहे. मात्र कल्याणमधील नागरीकांनी सिटी पार्क लगतच्या रस्त्याच्या दुभाजकामध्ये मोबाईल टॉवर उभारण्यास विरोध केला आहे. नागरीकांचा हा विरोध पाहता केडीएमसी काय कारवाई करणार असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने नऊ ठिकाणी रस्त्याच्या दुभाजकामध्ये मोबाईल टॉवर उभारण्याची परवानगी खाजगी टॉवर कंपनीला दिली आहे. या संदर्भात कल्याण पश्चिमेतील सिटी पार्क परिसरातील गुरु आत्मान इमारतीत राहणारे रहिवासी प्रकाश नाईक यांनी सांगितले की, महापालिका अधिकारी वर्गाने नागरीकांना विश्वासात न घेता खाजगी टॉवर कंपनीला रस्त्याच्या दुभाजकामध्ये मोबाईल टॉवर उभारण्यास परवानगी दिली आहे. महापालिकेने हे काम देताना अटी शर्तीचे उल्लंघन केल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे. यासंदर्भात रहिवासियांनी पालिकेकडे पत्र व्यवहार करून निषेध दर्शविला होता. त्यावेळी अधिकार्याने आम्हाला आश्वसन दिले होते. की, कुठल्याही प्रकारचा मोबाईल टॉवर उभारले जाणार नाही.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख विशांत कांबळे यान सांगितले की, योगीधाम परिसर आणि सिटी पार्कसह महापालिकेने 9 ठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्याची परवानगी दिली आहे, त्याला नागरीकांनी हरकत घेताल होती. त्याला महापालिकेने काही एक दाद दिलेली नाही. ज्या अटी शर्तीप्रमाण महापालिकेने खाजगी टॉवर कंपनीला महापालिकेने परवानगी दिली आहे. त्या पैकी अट क्रमांक 11वे उल्लंघन झाले आहे. कंपनीने टॉवर उभारण्यासाठी झाडे तोडली आहेत. त्यानुसार महापालिकेने कंपनीच्या विरोधात कारवाई करुन कंपनीला दिलेला कार्यादेश रद्द करण्यात यावा अशी मागणी कांबळे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
विशेष म्हणजे सिटी पार्क येथेही मोबाईल टॉवर उभारला जाणार आहे. हे ठिकाण हे एक विरंगुळा केंद्र आहे. त्याठीकाणी लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध येतात. त्यांच्या आरोग्यावर मोबाईल टॉवररचा विपरीत परिमाण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात व प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त प्रिती गाडे यांच्याशी मोबाईल टावर परवानगी आणि कामा संदर्भात विचरणा केली असता, याबाबत आपणास माहीत नाही, असे मोघम उत्तर देत, या संदर्भात उप आयुक्त मालमत्ता यांच्याशी संपर्क साधा असता असे तर ई गव्हर्नर सांगितले, तर मालमत्ता विभागाचे उप आयुक्त यांच्या शी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. चा टेंभा मिरविणार्या केडीएमसीकडे मोबाईल टाँवर परवानगी संदर्भात अवकाश चिन्ह विभाग देखील कार्यन्वित नसल्याचे जाणकाराचे म्हणणे असल्याने कागदी घोडे नाचवित मनपाचा सावळा गोंधळ कारभार सुरू आहे का? असा सवाल दक्ष नागरिकांकडून यानिमित्ताने होत आहे.






