राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने धुमशान घातलं आहे. पुण्यानंतर आता कल्याण डोंबिवलीमध्य़े वातावरणाता धुळीचं वादळ येत असल्याचं दिसून आलं आहे. संध्याकाळी चारच्या सुमारास कल्याण डोंबिवली परिसराच मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट पाहायला मिळत आहे. जोरदार वादळ वाऱ्यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली आहे.
गेले काही दिवसांपासून वातावरणात वाढत असलेल्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण पहायाला मिळत होतं. कल्याण डोंबिवली प्रमाणेच शहापूर तालुक्य़ातही पावासाने चांगलीच हजेरी लावली आहे. दुपारच्य़ा सुमारास शहापूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारादेखील पडल्या आहेत. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे प्रशासनाने वीज पुरवठा खंडित केला आहे. कल्याण-डोंबिवली, पनवेल, शहापूर, नवी मुंबईत धुळीचे वादळ आल्याने व्यापाऱ्य़ाचे चांगलेच हाल झाले आहेत.
दरम्यान आज दुपारच्या सुमारास सोसाट्याचा वारा वाहू लागला .त्यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य पसरले होते .या वाऱ्यामुळे आंबिवली येथे स्टेशन रोड वर असलेले भले मोठे झाफ उन्मळून पडले. झाडालगत उभ्या असलेल्या दुचाकींवर हे झाड कोसळल्याने चार ते पाच दुचाकींचे नुकसान झाले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही ..घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटना स्थळी धाव घेत झाड बाजूला हटविले .
गेले काही दिवस राज्यात सततच्या अवकाळी पावसाचा फटका बळीराजाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. अवकाळीमुळे रत्नागिरी, राजापूर, सिंधुदुर्ग आणि देवगड या भागातील आंब्याच्या मोहर गळून गेल्याने शेतकरी हवालदीन झाले आहेत.अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथील राजू जगन्नाथ मगर यांची करंजगाव शिवार गट ६७ मध्ये १ हेक्टर १८ आर शेती आहे. या शेतात २.५ एकर मध्ये कांदे लावले होते. काढणीला आलेल्या २.५ एकरातील संपूर्ण कांदा पिकाचे नुकसान झालेले आहे. आपण अगोदरच कर्जबारी असून, शासनाकडून आता मदत मिळाली नाही तर, कर्ज कसे भरणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत. शासनाकडून मदत मिळाली नाही तर, आत्महत्या हाच आमच्यासमोर पर्याय उरला आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.