महायुतीचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane ) यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल कणकवलीमध्ये (Kankavali) सभा घेतली. नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या पाहायला मिळणार आहे.या सभेमध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena party chief Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती. याच टीकेवरून आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) चांगलेच आक्रमक झालेले दिसून आले.त्यांनी राज ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
राज ठाकरे प्रचाराला गेले की उमेदवार पडतो- वैभव नाईक
राज ठाकरेंनी सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. याच टीकेला प्रतिउत्तर देत वैभव नाईक म्हणाले, राज ठाकरेंना कोकणाची काही माहिती नाही. राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात त्यांच्या पराभव होतो. हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. राज ठाकरे प्रचाराला गेले की उमेदवार पडतो म्हणजे पडतो.राज ठाकरेंमुळे आम्हीच शिवसेनेचे सिंधुदुर्ग – रत्नागिरीची जागा जिंकणार आहोत. राज ठाकरेंनी मागच्या वेळेस ‘लाव रे व्हिडीओ’ लावला होता. तेव्हा देखील आम्हीच जिंकलो होतो, असे म्हणत वैभव नाईक यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
सभेत काय म्हणाले होते राज ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले अडीच अडीच वर्षांचा शब्द पाळला नाही म्हणून मी महायुतीमधून बाहेर पडलो. याचा अर्थ समजा भाजपाने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिले असते तर हे मोदींविरोधात बोलले असते का? सत्तेचा बोळा तोंडात कोंबला असता तर आज विरोधामध्ये नसते. कोकणातले उद्योगधंदे गुजरातला जात आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. २०१४ ते २०१९ मध्ये तुम्ही भाजपसोबत सत्तेत होतात नंतर २०१९ ते २०२२ मध्ये स्वतः मुख्यमंत्री होतात म्हणजे गेल्या दहा वर्षात तुम्ही साडेसात वर्ष सत्तेत होतात मग उद्योग गुजरातला गेलेच कसे? तुम्ही विरोध का केला नाहीत? उद्योगधंदा आला की उद्धव ठाकरेंचा खासदार विरोध करणार आणि आमदार पाठिंबा देणार. हे कोणतं पक्षाचं धोरण ? असे म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.