फोटो सौजन्य - सोशल मिडीया
काही दिवसांपूर्वी पुण्यात २ गर्भवती महिलांसह ६ जणांना झिका व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आता हा आकडा ७ वर गेला आहे. आतापर्यंत पुण्यातील ७ जणांना झिका व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पुण्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून पुण्यात आरोग्य सर्वेक्षण सुरु झालं आहे. झिका व्हायरचा सर्वाधिक धोका गर्भवती महिलांना असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेनं गर्भवती महिलांच्या तपासणीवर सर्वाधिक भर दिला आहे.
पुण्यातील आरोग्य विभागानं आतापर्यंत सुमारे ४१ गर्भवती महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठवले आहेत. एरंडवणे परिसरातील १४, मुंढवा परिसरातील १८ आणि डहाणूकर कॉलनी परिसरातील ९ गर्भवतींचे नमुने आरोग्य विभागाने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले आहेत. गर्भवती महिलांसह आरोग्य विभागाने एकूण ६४ जणांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीला पाठवविले आहेत. यापैकी २५ जणांचा अहवाल आरोग्य विभागाला मिळाला आहे. तर इतर अहवालांसाठी आरोग्य विभाग प्रतिक्षा करत आहे.
पुण्यात झिका व्हायरच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला असून पुण्यात सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणावेळी शहरातील २४६ घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या. आरोग्य विभागाने याप्रकरणी ८२ जणांना नोटीस बजावली आहे. तसेच ६६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पुण्यातील झिका व्हायरसचा पहिला रुग्ण एरंडवणे परिसरात आढळला. एरंडवणे परिसरात एका ४६ वर्षीय डॉक्टरला झिका व्हायरसचा संसर्ग झाला होता. डॉक्टरच्या १५ वर्षीय मुलीलाही झिकाची लागण झाली होती. त्यानंतर मुंढव्यातील कोद्रे वस्ती परिसरात झिका व्हायरसचे २ रुग्ण आढळले होते.एरंडवणे परिसरात एकूण ७२ गर्भवती महिला आहेत. मुंढवा परिसरात ६० गर्भवती महिला आहेत. झिका व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत आरोग्य विभागाने एरंडवणे परिसरातील १४, मुंढवा परिसरातील १८ आणि डहाणूकर कॉलनी परिसरातील ९ गर्भवतींचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले आहेत.
झिका व्हायरसची लक्षणे