संग्रहित फोटो
त्यानुसार, पुणे महानगरपालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज देण्याची व स्वीकारण्याची प्रक्रिया येत्या १५ व १६ डिसेंबर या दोन अतिरिक्त दिवसांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. या कालावधीत इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, काँग्रेस भवन येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जमा करावेत, असे आवाहन पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले आहे.
पुणे शहरातील विविध प्रभागांतून काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत असून, स्थानिक पातळीवर पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही अर्ज प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवारी अर्ज प्रक्रियेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सक्रिय व आक्रमकपणे तयारी करत असल्याचे स्पष्ट संकेत देतो, अशी माहिती शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
भाजपच्या नेत्यांची होणार दमछाक
पुण्यात भाजपकडून उमेदवारी देण्यासाठी भाजपा पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांची मोठी दमछाक होणार आहे. कारण भाजपाकडून २५०० इच्छूक उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत. उमेदवारांच्या मुलाखती पुण्यातील भाजपाच्या कार्यालयात पार पडणार आहेत. पुण्यातील ४१ प्रभागांसाठी या सगळ्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. १६५ जागांसाठी या २५०० उमेदवारांच्या मुलाखतील घेतल्या जाणार आहेत. पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बीडकर, श्रीनाथ भिमाले हे तिघे आज मुलाखती घेणार आहेत. तिघांकडेही प्रत्येकी विधानसभा मतदार संघ वाटून दिलेले आहेत. धीरज घाटे यांच्याकडे तीन, गणेश बीडकर यांच्याकडे तीन आणि श्रीनाथ भिमाले यांच्याकडे दोन अशा पुण्यातील आठ विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारांच्या स्वतंत्र मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यात त्या-त्या प्रभागातील माहिती, उमेदवारांची इच्छाशक्ती, आधी केलेली काम आणि सामाजिक वर्चस्व पाहून उमेदवारी देणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.






