सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर उपसाबंदी उठवण्यात आली आहे; मात्र सध्या कृष्णा नदी पात्रात अनेक ठिकाणी पाणी नाही. त्यामुळे बंदी उठवून उपयोग काय, असा सवाल शेतकरी करत आहेत. कोयना धरणातून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
जिल्ह्यात उपसाबंदीची कडक अंमलबजावणी सुरू असताना सातारा जिल्ह्यात मात्र सिंचनासाठी पाणी उपसा सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर आंदोलन केले. सांगली व सातारा जिल्ह्यात होत असलेल्या दुजाभावाबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यावर पाटबंधारे विभागाने रविवारपासून उपसाबंदी शिथिल करीत असल्याचे लेखी आश्वासन दिले. उपसाबंदी उठली असली तरी शनिवारी अनेक ठिकाणी नदी कोरडी पडलेली होती. पाणी नसल्याने उपसाबंदी उठवून उपयोग काय, असा सवाल शेतकरी करीत आहेत.
दिवसातून एक वेळ पाणी पुरवठा
नदीपात्र कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याचा धोका आहे. उपलब्ध पाणी जपून वापरण्यासाठी सांगली महापालिकेने दिवसातून एक वेळेस पाणी देणार असल्याचे सांगितले आहे.
[blockquote content=” कोयना धरणात अपुरा पाणीसाठा आहे. जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करून हा साठा ठेवला आहे. टेंभू बॅरेजमधून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण येणार नाही. ” pic=”” name=”-ज्योती देवकर, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग”]