मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून राहिलेल्या कसबा पेठ (Kasba Peth Bypoll) आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीचा आज निकाल (Result) लागला आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले आहेत, असं निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केलं आहे. कसब्यात रवींद्र धंगेकरांचा 11 हजार 040 मतांनी विजयी मिळाली आहेत, तर हेमंत रासनेंना 61771 मिळाली मते मिळाली आहेत.
कसबा पेठ पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून मोठे प्रयत्न करण्यात आले होते. पण या निवडणुकीत धंगेकरांचा विजय झाला. धंगेकरांचा हा विजय महाविकास आघाडीचा एकजुटीचा विजय आहे. कसबा पेठेत रवींद्र धंगेकरांच्या रूपाने योग्य उमेदवार निवडून आला. मुख्यमंत्र्यांनी रोड शो करून देखील कसब्यात भाजप उमेदवाराचा पराभव झाला. हा पराभव म्हणजे शिंदे-फडणवीस नेतृत्त्वाचा पराभव आहे’.
मतदार हा राजा असतो
मतदार राजा आहे. त्यांचा मानसन्मान केला पाहिजे. त्यांना गृहीत धरून चालणार नाही. शेवटी मतदारांना जे योग्य असतं तेच ते करत असतात. हा पराभव म्हणजे शिंदे-फडणवीस नेतृत्त्वाचा पराभव आहे. तिन्ही पक्ष एकत्र आल्यास आगामी निवडणुकांत चांगलं यश मिळेल. आता इथून पुढे महाविकास आघाडीला जागावापट व्यवस्थित करावं लागणार आहे, असे अजित पवार म्हणाले.
बापट यांना विश्रांतीची गरज होती पण…
पुण्याचे खासदार आणि भाजप नेते गिरीश बापट यांना भाजपने निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. त्यावरूनही त्यांनी समाचार घेतला. गिरीश बापट यांना विश्रांतीची गरज होती. पण भाजपने त्यांना निवडणुकीच्या प्रचारसभेत आणले.