नवीन मोटार वाहन कायदा हा ट्रक चालकांच्या जीवावर उठणारा आणि अन्यायकारक असल्याचे सांगत नियमात बदल करण्याची मागणी केली माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच वाहनकायदा करणाऱ्याचे डोकं ठिकाण्यावर ठेवून कायदा बनवायला हवा असे वक्तव्य ही खोत यांनी केले आहे. ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये बोलत होते.
काय आहे नवा कायदा?
केंद्रसरकारने काल मोटार वाहन कायदा कडक करत राष्ट्रीय महामार्गावर एखादा अपघात झाला आणि चालक पळून गेला तर त्याला सात वर्षाचा तुरुंगवास व सात लाखाचा दंड अशा शिक्षेचा नियम काढला आहे.
मागणी काय?
या कायद्याविरोधात वाहतूक संघटनेच्यावतीने संपूर्ण राज्यात ट्रक चालकांनी बंदची हाक देत आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे हा कायदा बदलणे गरजेचे आहे. एखादा अपघात झाल्यानंतर चालक तेथेच थांबला तर त्यांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. असे काही घडलेच तर चालकाने पळून न जाता जवळच्या पोलीस ठाण्यात हजर राहावे व सरकारने त्यांच्या शिक्षेची रक्कम कमी करून एक लाख किंवा त्याहून ही कमी करून कायद्यता बदल करण्याची मागणी केली आहे.