मुंबईत आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आहे. गेल्या महिन्याभरात महाविकास आघाडीने छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे दोन जंगी संभा घेतल्यानंतर तिन्ही पक्ष आज मुंबईत सभा घेत आहेत. या सभेसाठी वांद्रे कुर्ला संकुलातील नरे पार्कची निवड करण्यात आली आहे . यावेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी भाषण करत भाजप आणि शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली. ‘माणसं त्यांच्या पक्षात गेले नाही तर धमक्या दिल्या जातात’ असा आरोप त्यांनी केला. ‘मुंबईला राज्यातून तोडण्याचा डाव’ असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.बरसू प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले कि या प्रकल्पामुळे मुंबई ते वेंगुर्ला समुद्र दूषित होईल. मुळात ‘रिफायनरी कोकणात कशासाठी?’. असा सवाल त्यांनी केला.
मुंबईवर राग असलेले लोक दिल्लीत बसलेत; जितेंद्र आव्हाडांचा भाजपावर हल्लाबोल
यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातलं भाजपा सरकार आणि राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. आव्हाड म्हणाले की, मुंबई ही कामगारांच्या घामाने उभी राहिली आहे. इथल्या कष्टकरी मराठी माणसाने मुंबईची शोभा वाढवली. मागील १० वर्षात मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईवर राग असलेले लोक दिल्लीत बसले आहेत, असे ते म्हणाले.