सहकार क्षेत्राचे आधुनिक प्रशिक्षण मिळावे म्हणून प्रशिक्षण सभागृह उभारण्यात आले (फोटो - टीम नवराष्ट्र)
Satara News : सातारा : सहकार चळवळीतील कार्यकर्ते व सेवकांना आधुनिक व प्रभावी प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने सातारा जिल्ह्यात सहकार (Cooperation) प्रशिक्षण सभागृह उभारण्यात आले आहे. या प्रशिक्षण सभागृहाचे उद्घाटन सोमवार, दि. २० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता अजिंक्य कॉलनी, कॅम्प येथे होणार आहे.
या सभागृहाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार नितीन पाटील असणार असून माजी खासदार संजय मंडलीक यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
उद्घाटनानंतर सकाळी ११ वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सहकारी संस्था कार्यकर्त्यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. ‘सहकार चळवळीसमोरील आव्हाने व उपाययोजना’ या विषयावर सहकार मंत्रालयातील सेवानिवृत्त सहसचिव एस. बी. पाटील आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे समन्वयक रमेश बांडे मार्गदर्शन करणार आहेत.
हे देखील वाचा : नाशिकच्या TCS नंतर आता पुण्यातील Infosys मध्ये लव्ह जिहादचा डाव? IT क्षेत्रात उडाली खळबळ
हा संयुक्त कार्यक्रम महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, सातारा जिल्हा सहकारी बोर्ड, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती संघाचे संचालक धनंजय शेडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रा. जितेंद्र जगदाळे, संजीव साळुंखे यांच्यासह संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमास राष्ट्रीय मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष संजीव कुसाळकर, उपाध्यक्ष अर्जुनराव बोरुडे, मानद सचिव रामदास मोरे, ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, उपाध्यक्ष अनिल देसाई, विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम, सहनिबंधक सोनाली रावल ठाकूर, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापूरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सहकार चळवळीच्या बळकटीसाठी आयोजित या कार्यक्रमास सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रा. जितेंद्र जगदाळे, उपाध्यक्ष संजीव साळुंखे व संचालक मंडळाने केले आहे.
हे देखील वाचा : श्रेयवादाचे राजकारण, भाजपात नाराजी; पक्ष संघटना कमकुवत अन् कार्यकर्ते निरुत्साही
विनापरवाना खैर लाकूड तस्करीवर महाबळेश्वर वन विभागाचा निशाणा
सुनील लांडगे वन परिमंडळ अधिकारी महाबळेश्वर व कर्मचारी रात्रगस्त करीत असताना विनापरवाना खैर प्रजातीची लाकडे वाहतूक करताना महिंद्रा पिकअप MH 08 H 7790 व महिंद्रा स्कार्पियो MH 43 R 0906 वन विभागाने पकडली. आरोपी संतोष पांडुरंग पार्टे, समीर संतोष पार्टे रा. केळघर ता. जावली जिल्हा सातारा यांना ताब्यात घेतले. सदर आरोपी यांनी गुन्हा कबूल केला असून वन परिमंडळ अधिकारी महाबळेश्वर यांनी भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41(2) b अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हे प्रकरणात गाडी व माल किंमत असे अंदाजे 5,50,000/- माल जप्त केला.






