लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. तसेच त्यांना आता आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी रविंद्र वायकर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी शिंदे गटाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीवर अनिल परब यांनी दिलेल्या आव्हानंतर आता शिवसेना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वायकरांच्या उमेदवारीवर भाष्य केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, एवढी लोक भाड्याने का घेता? इंजिनाची चाक निखळून स्टेपनीवर जात आहे का?? तुमची ओरिजिनल लोक होती ती कुठं गेली? आज माझ्याकडे भाजपाची लोक येत आहेत. ती तुम्हाला कंटाळली आहेत. कधी एकेकाळी मी त्यांचा मित्र होतो. त्यांनी आपला चेहरा आरशात एकदा पाहून घ्यावा. एवढ्या मेकअपची गरज का लागते याचा विचार करावा? असे म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला आहे.
घोसाळकरांच्या उमेदवारीवर उद्धव ठाकरे म्हणाले,
घोसाळकर काँग्रेसच्या चिन्हावर लढणार का? यावर देखील उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. घोसाळकर यांच्या हातात, मनगटात नाही तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा शिवसेना आहे. घोसाळकरांना दुसऱ्या पक्षातून उमेदवारी देणं शक्य नाही. घोसाळकर हे कट्टर कार्यकर्ते आहेत, त्यांच्या मनात आणि हृदयात शिवसेना आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, काहींचे कौतुक करतो की त्यांनी बिनशर्त पाठींबा दिला आहे. तर काहीजण लढण्याचे नाटक करून पाठिंबा देत आहेत. हे सर्व नाटक जनता ओळखते. त्यामुळे आता थेट हुकूमशाही विरोधात लोकशाही अशी लढत होणार आहे. माझं मत मी मांडलं आहे. एकाधिकारशाही देशाला घातक आहे. हुकूमशाला पुन्हा एकदा देशाने हे सगळ्यांसाठी घातक ठरणार आहे. आपल्याला वाटतं संमिश्र सरकार नको, पण इतिहास जर बघितला, तर अटल बिहारी वाजपेयी यांनी संमिश्र सरकार चांगल्या प्रकारे चालवला होता, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनी सुद्धा चांगलं सरकार चाललेलं होत, देश मजबूत पाहिजे असेल तर तर सरकार संमिश्र हवं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.