मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून राज्याच्या राजकारणात झालेले बदल सर्वश्रुत आहे. शिंदे गट आणि ठाकरे तयार होण्यापासून ते एकमेंकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यापर्यंत रोज काही ना काही होत आहे. अशातच आता भाजप सोबत गेलेल्या एकनाथ शिंदे यांनी भर सभेत भाजप त्रास देत आहे म्हणत राजीनामा दिला होता, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना करून दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राऊत (Uddhav Thackeray Sanjay Raut Interview) यांनी मुलाखत घेतली आणि या मुलाखतीचा पहिला भाग सोमवारी प्रसिद्ध झाला आहे. तसेच या मुलाखतीचा दुसरा भाग हा बुधवारी प्रसिद्ध झाला. त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर चांगलेच ताशेरे ओढले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या त्या क्लिपचं काय?
या क्लिपबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री होईल असं मी कधीही बोललो नव्हतो, तेव्हा मला एक आव्हान स्वीकारावं लागलं होतं. या सगळ्या गोष्टी ठरवल्यानंतर नाकारण्यात आल्या. त्यामुळे मला मुख्यमंत्री व्हावं लागलं. मी मुख्यमंत्री झालो, आता मी होऊन गेलेला आहे, पण प्रॉब्लेम काय तुम्हाला? ज्या बाळासाहेबांचा फोटो लावताय त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवलं? इतकी अडीच वर्ष किंवा त्याच्या आधी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्याची क्लिप वायरल होत आहे. तेव्हा भाजप कसा अत्याचार करतो आहे हे सांगत राजीनामा दिला होता, ही क्लिप आहे, माझ्या समोर त्यांनी राजीनामा दिला होता आणि ते स्वतः बोलत आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी त्या क्लिपचाही हिशोब काढला आहे.