मुंबई : पुणे मनसेमध्ये गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या नाराजीनाट्याला आज पूर्णविराम मिळाला आहे. मनसे नेते वसंत मोरे यांच्यासह दोन दिवसापूर्वी मनसेला राजीनामा दिलेले निलेश माझिरे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर वसंत मोरे यांची आणि निलेश माझिरे यांची नाराजी दूर झाली का या चर्चा सुरू झाल्या. यावर आता वसंत मोरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
निलेश माझिरे यांनी फेसबुकवरुन मनसेला राजीनामा देत असल्याची माहिती दिली होती. यानंतर पुणे मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. या चर्चांनंतर आज वसंत मोरे यांनी निलेश माझिरे यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून निलेश माझिरे यांनी मनसेला राम-राम ठोकल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भेटीवर प्रतिक्राया दिली आहे.
[read_also content=”देशात धर्मांध लोकांचे प्रस्थ वाढविण्याचा सत्ताधारी भाजपाचा प्रयत्न !: नाना पटोले https://www.navarashtra.com/maharashtra/ruling-bjp-attempt-to-increase-the-number-of-fanatics-in-the-country-nana-patole-nrdm-290489.html”]
वसंत मोरे नेमकं काय म्हणाले?
वसंत मोरे म्हणाले, मी माझी सगळी नाराजी राज ठाकरे यांना सांगितली. माझ्या नाराजीची दखल राज ठाकरे यांनी घेतली. मला आणि निलेश माझिरे यांना स्वत: राज ठाकरे यांनी भेटायला बोलावले होते. माझिरे आणि माझ्यावर अन्याय झाल्याचे मी सांगितले, यावर राज ठाकरे यांनी निलेश माझिरे यांची मनसे माथाडी कामगार सेना पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.
राज ठाकरे पुण्यात बैठकांना जाणार आहेत. त्याअगोदर शहर कार्यकारणीची बैठक घेणार आहेत. शहर कार्यालयात बैठक झाली तर जायचं नाही ही माझी भूमिका आहे. प्रत्येक पक्षात गटबाजी असते, असंही वसंत मोरे म्हणाले.