अमरावती : राजस्थान मधील उदयपूर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजीत ‘नवसंकल्प २०२२’ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेण्यात आला. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हिरीरीने केलेल्या आयोजनामुळे या शिबिराला भव्य दिव्या स्वरूप प्राप्त झाले आहे.
विशेष म्हणजे या शिबिराला काँग्रेसचे राहुल गांधी हे ट्रेनने राजस्थानात पोहोचले होते. तसेच, या शिबिरात युवा कार्यकर्ता आणि नेत्यांना प्राधान्य दैन्य आले आहे. या शिबीरास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर या उपस्थित होत्या. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच काँग्रेस पक्षाच्या इतर पदाधिकार्यांसोबत भेट घेत अनेक विषयांवर चर्चा केल्या.