जन सुरक्षा कायदा म्हणजे लोकशाही मार्गाने घेतलेला ठोस निर्णय; फडणवीस स्पष्टच बोलले
मुंबई: भाजपने महाराष्ट्रात सुरू केलेला वोट जिहादचा वाद दिवसेंदिवस आणखीनच पेटत चालला आहे. महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या गीताचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राम मंदिराच्या पायाभरणी समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायलेल्या जागो…जागो तो एक बार…’ या गाण्याचे बोल ऐकवत चित्रा वाघ यांनी मुस्लिम बोर्डाचे प्रवक्ते – सज्जाद नोमानी यांच्यावर हल्लाबो निशाणा साधला आहे,
एक्सवर पोस्ट करताना चित्रा वाघ यांनी आवाहन केलं आहे, ‘सज्जाद नोमानी यांनी वोट जिहादसाठी आव्हान दिले आहे. त्यामुळे आता आम्हाला धर्मयुद्ध करावेच लागणार आहे. आता वेळ आली आहे जागे होण्याची आणि जनजागृती करण्याची… आमचे नेते मा. राममंदिराच्या पायाभरणी समारंभात देवेंद्रजींनी गायलेले गाणे आता आमचा मंत्र असेल. जागे व्हा… आत्ता नाही तर कधीच नाही… जय श्री राम…!’ असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये आवाहन केलं आहे.
“….आता नातू भाजपावर संविधान बदलाचा आरोप करतो”; अकलूजमध्ये धडाडली नितीन गडकरींची तोफ
तसेच, इस्लामिक विद्वान सज्जाद नोमानी यांनी महायुती सरकारच्या विरोधात केलेल्या “वोट-जिहाद” च्या कथित आवाहनाचा संदर्भ देत, देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यातील सभेत “मतांचे धर्मयुद्ध” करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर भाजपला मत देणाऱ्या व्यक्तीला बहिष्कृत करून त्याचे हुक्का-पाणी बंद करावे, असं नोमानी यांनी म्हटलं होतं
दरम्यान, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “मतांसाठी धर्मयुद्ध” पुकारल्याने भारतीय निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत नाही का, असा सवाल उपस्थित केला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील डोंबिवली येथे प्रचार सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या पक्षाच्या निवडणूक गीतातून “जय भवानी, जय शिवाजी” हे शब्द काढून टाकण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी तसे करण्यास नकार दिला. पण आता “देवेंद्र फडणवीस यांनी मतांसाठी धर्मयुद्ध पुकारले आहे. आता धर्मयुद्ध हा शब्द तुमच्या आचार संहितेशी सुसंगत आहे का, असा सवाल त्यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.
वर्षाअखेरीस कार खरेदी करण्याचे ‘हे’ 5 फायदे तुम्हाला ठाऊक आहे का?
आज भाजप हा बाहेरून आयात केलेल्या संधीसाधू नेत्यांनी भरलेला ‘हायब्रीड’ पक्ष बनला आहे. भाजप आज संधूसाधू नेत्यांचे अड्डे बनला आहे. पण आमचे हिंदुत्त्व हा जनतेच्या घरात दिवे लावणारे हिंदुत्त्व आहे. पण भाजपाचे हिंदुत्त्व हे त्यांना आगीत झोकून देणारे आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवरही टीका केली.
तसेच, दुसरीकडे शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केला आहे. फडणवीस हिंदू-मुस्लीममधील चांगले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदू-मुस्लिमांमध्ये चांगले वातावरण असताना देवेंद्र फडणवीस ते बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. वोट जिहादचे वक्तव्य करून देवेंद्र फडणवीस हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.