भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लोकसभा निवडणुकीत व्होट जिहादचा मुद्दा उपस्थित केला आहे. यानंतर त्यांनी सोशल साईटवर X एक व्हिडिओ जारी केला आहे तसेच रफिक नगर आणि झाकीर हुसेन नगरसह 1 डझन बूथमध्ये भाजपला केवळ 66 तर उद्धव ठाकरे सेनेला 5417 मते मिळाली. या बूथवर मुस्लिम मतदारांनी व्होट जिहाद करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच भाजपला येथून पराभवाला सामोरे जावे लागले, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.
तसेच मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत यांचा विजय झाला. पण दक्षिण मुंबईमध्ये येणाऱ्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात वोट जिहाद झाल्याचा मोठा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे. बूथ 191 मध्ये यामिनी जाधव यांना केवळ एकच मत मिळालं आहे. तर, अरविंद सावंत यांना या बूधमध्ये तब्बल 311 मतं मिळाली आहेत. एकंदरित वोटज जिहाद आता मुंबादेवी मातेच्या चरणीही पोहोचला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांच्या या आरोपानंतर मुस्लिम संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मानखुर्दमधील मुस्लिम संघटनांचा मोर्चा किरीट सोमय्यांच्या निवासस्थानी धडकणार आहे. ईशान्य मुंबईतील लोकसभा निवडणुकीत मानखुर्दमध्ये बांगलादेशीनी मतदान केल्याची टिकी किरीट सोमय्या यांनी केली होती. त्याविरोधात मुस्लिम संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.