Water Supply To Villages In Indapur Taluka By 40 Tankers Scarcity In 19 Villages And 206 Wada Settlements Nrdm
इंदापूर तालुक्यातील गावांना ४० टँकरने पाणीपुरवठा; १९ गावे २०६ वाड्या वस्त्यांवर टंचाईच्या झळा
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तालुक्यात प्रकर्षाने पाणी टंचाई जाणवू लागली आहे. मार्च महिन्यात आठ टँकरने पाणी पुरवठा होत होता. ५ मार्चपासून त्यामध्ये ३२ टँकरची वाढ झाली आहे.
इंदापूर : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तालुक्यात प्रकर्षाने पाणी टंचाई जाणवू लागली आहे. मार्च महिन्यात आठ टँकरने पाणी पुरवठा होत होता. ५ मार्चपासून त्यामध्ये ३२ टँकरची वाढ झाली आहे. आजघडीला १९ गावे व त्या खालील २०६ वाड्या वस्त्यांवर ४० टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. या भागातील ७३ हजार ४८० लोक, ३१ हजार ४५४ गायी म्हशींसारखी दुभती जनावरे व ३५ हजार ११९ शेळ्या मेंढ्यांवर टँकरच्या पाण्याने तहान भागवण्याची वेळ आली आहे.
५ मे पासून टँकरची संख्या ३२ ने वाढली
सन २०१९ मध्ये तालुक्यातील ४६ गावे व त्याखालील ३०० वाड्या वस्त्यांना ६९ टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. ९ विहिरी व विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. १ लाख ३० हजार ३९५ लोक व ७ हजार ९९ पशुधनाची तहान टँकरच्या पाण्याने भागवण्यात आली होती. त्यानंतर २०२३ पर्यंत तालुक्यात टँकरची आवश्यकता भासली नाही. थेट यंदाच्या मार्च महिन्यात टँकर सुरु झाले. ४ गावे व २७ वाड्यावरील ४ हजार ८५० नागरिकांना आठ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. एप्रिल महिन्यात टंचाई अधिक तीव्र झाली. ५ मे पासून टँकरची संख्या ३२ ने वाढली.
धरणातील पाण्याची पातळी खालावली
सध्या सोलापूरसाठी उजनी धरणातून पाणी सोडले जात आहे. धरणातील पाण्याची पातळी वजा ५६.५६ टक्क्यांच्या खाली गेली आहे. ही पाणीपातळी आणखी खालावली तर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पाणलोट क्षेत्रातील गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी देखील टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो की काय अशी स्थिती निर्माण झाल्यास नवल वाटणार नाही, अशी परिस्थिती आहे.
टँकरने पाणीपुरवठा होत असलेली गावे
कळस गाव व त्याखालील ३ वाड्या, चाकाटी-गावठान व ३ वस्त्या, पिठेवाडी व त्या खालील१० वाड्या वस्त्या, तरंगवाडी गाव व १ वस्ती, निरनिमगाव व त्याखालील ६ वाड्या वस्त्या, झगडेवाडी गावठाण व २ वस्त्या, व्याहाळी व त्याखालील १० वाड्या वस्त्या, निमगाव केतकी व त्या खालील ४० वाडया वस्त्या, वरकुटे बुद्रुक गावठाण व त्याखालील १० वाडया वस्त्या, कचरवाडी बावडा व त्याखालील ७ वाड्या वस्त्या, वरकुटे खुर्द व त्याखालील ७ वाड्या वस्त्या, गलांडवाडी नं.२ व त्याखालील ३ वाड्या वस्त्या, सुरवड व त्याखालील १७ वाड्या वस्त्या, बावडा व त्याखालील ५२ वाड्या वस्त्या, बोराटवाडी व त्याखालील १७ वाड्या वस्त्या, लुमेवाडी गावठाण, निंबोडी, लाखेवाडी व त्याखालील ७ वाड्या वस्त्या, वकीलवस्ती व त्याखालील ७ वाड्या वस्त्या, निरवांगी व त्याखालील १० वाड्या वस्त्या.
[blockquote content=”टँकरची आवश्यकता भासू नये यासाठी ग्रामपंचायतींनी टंचाई काळात स्वनिधी, ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असणारा पंधरावा वित्त आयोग इतर निधीच्या माध्यमातून प्राधान्याने टंचाई उपाययोजनाचे कामे पूर्ण करून घ्यावीत.” pic=”” name=”- सचिन खुडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, इंदापूर”]
Web Title: Water supply to villages in indapur taluka by 40 tankers scarcity in 19 villages and 206 wada settlements nrdm