सोलापूर : लोकसभा निवडणुकीबाबत (Loksabha Election) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी एक विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Congress MLA Praniti Shinde) यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे. काही जणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या, त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल’, असे त्यांनी सांगितले.
रोहित पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सोलापूर लोकसभेबाबत विधान केले. त्यांच्या या विधानानंतर प्रणिती शिंदेंनी जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, ‘कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल. रोहित पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी भाष्य केले होते. त्यांनी म्हटले होते, ‘लोकसभा सीट कोणी लढवायाची या संदर्भात महाविकास आघाडीची बैठक येत्या महिन्या दोन महिन्यात होईल असा माझा अंदाज आहे. सोलापूरची जागा काँग्रेसकडेच राहिलं की राष्ट्रवादीने लढवायची हे देखील त्याच बैठकीत ठरेल” असं विधान आमदार रोहित पवार यांनी केलं होतं’.
रोहित पवार यांच्या या विधानावरून प्रणिती शिंदे यांनी टीका केली. त्या म्हणाल्या, कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल.
महिला आमदारांवर हल्ले होत असतील तर…
तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांवर शाब्दिक आणि आता शारिरीक हल्ले होत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो. सरकार या हल्ल्यांकडे गांभीर्याने पाहत नाही. महिला आमदारांवर हल्ले होतात, ती ही एकटे असताना त्या मागचे कारण शोधले पाहिजे. महिला आमदारांवर असे हल्ले होत असतील तर सर्वसामान्यांचे काय? असा सवालही शिंदेंनी उपस्थित केला.