फोटो सौजन्य: गुगल
World Environment Day 2025: जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत राज्य प्रदुषण मंडळाने जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. दररोज भारतातील नगरपालिका हजारो टन घरगुती आणि व्यावसायिक कचरा गोळा करतात, पण UCO या धोकादायक कचर्याला या यादीत स्थान नाही. UCO हा “व्यावसायिक कचरा” म्हणून मानला जातो आणि त्यामुळे तो नगरपालिका कचर्या व्यवस्थापनातून बाहेर राहतो.
भारतामधील शहरांमध्ये कचर्याच्या समस्येशी लढताना, सामान्यतः प्लास्टिक, सेंद्रिय कचरा आणि इतर नाशवंत वस्तूंचेच लक्ष वेधले जाते. मात्र, वापरलेले स्वयंपाकाचे तेल (UCO) हे धोका निर्माण करणारे, पण आर्थिकदृष्ट्या महत्वाचे कचऱ्याचे एक महत्त्वाचे स्रोत दुर्लक्षित राहिले आहे. 2018 मध्ये केंद्र सरकारने ‘रिपर्पज युज्ड कुकिंग ऑइल’ (RUCO) योजना सुरु केली, तरी त्याची अंमलबजावणी अजूनही असंगत आणि अपुरी आहे. आता वेळ आली आहे की राज्यस्तरावर आदेश देऊन, नगरपालिका मार्फत प्रभावी UCO संकलनाची व्यवस्था निर्माण करावी.
संकलनात मोठा तुटवडा – सायलंट फेल्युअर
दररोज भारतातील नगरपालिका हजारो टन घरगुती आणि व्यावसायिक कचरा गोळा करतात, पण UCO या धोकादायक कचर्याला या यादीत स्थान नाही. UCO हा “व्यावसायिक कचरा” म्हणून मानला जातो आणि त्यामुळे तो नगरपालिका कचर्या व्यवस्थापनातून बाहेर राहतो. परिणामी, UCO बेकायदेशीर पद्धतीने खाद्यपदार्थांमध्ये वापरला जातो, एवढंच नव्हे तर UCO मुळे नदी, नाले आणि जमिनीलाही प्रदूषित करतो.
कमी खर्चात मोठा फायदा
UCO हा एक असा कचरा आहे ज्याला वेगळ्या प्रकारचे व्यवस्थापन लागत नाही. तो जैवइंधन (बायोडिझेल) तयार करण्यासाठी वापरला जातो आणि मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि स्नॅक मॅन्युफॅक्चरर्सकडून त्याचा संग्रह करता येतो.
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे आणि नगरपालिका यांची भूमिका
UCO संकलनासाठी सध्याच्या कचर्या संकलन यंत्रणेचा भाग म्हणून राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांनी देखरेख करणे आवश्यक आहे.
UCO उत्पादकांना (ज्यांच्या कडे ≥५० किलो UCO आहे) नोंदणी अनिवार्य करावी.
अधिकृत संकलकांचे निवडणूक किंवा मनमानी न करता SPCB मार्फत नियुक्ती.
GPS सह इतर कचर्या वाहतुकीच्या यंत्रणांमध्ये UCO ट्रॅकिंग समाकलित करणे.
जनजागृती मोहिमांद्वारे वाणिज्यिक स्वयंपाकघरांपासून ते घरांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणे.
FSSAI आणि बायोडिझेल उत्पादकांशी समन्वय साधणे.
RUCO धोरण अस्तित्वात, पण अंमलबजावणी कमी
FSSAI ने RUCO धोरणाची सुरुवात केली आहे. ज्याचा उद्देश UCO ला खाद्यपदार्थांपासून वाचवून इंधनासाठी वापरणे आहे. बायोडिझेल उत्पादक तयार आहेत, पण संकलनाची व्यवस्था नसल्यामुळे हा उपक्रम फक्त कागदावरच मर्यादित राहिला आहे.
राज्य आणि नगरपालिका आता कचरा व्यवस्थापनासाठी करोडो रुपये खर्च करत आहेत, पण UCO संकलनासाठी इतका खर्च लागत नाही. योग्य नियोजनाने हा उपक्रम फायदेशीर ठरू शकतो, ज्यामुळे पर्यावरणाचा बचाव होईल, स्वच्छ ऊर्जा निर्माण होईल आणि कार्बन क्रेडिट्सही मिळू शकतील.
हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नाही
वापरलेल्या स्वयंपाकाच्या तेलाचा प्रभावी संकलन हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नाही तर तो शासन आणि नियमांचे दायित्व आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांनी आणि नगरपालिका यांनी त्वरीत उपाययोजना करणे गरजेचे आहे. UCO हा फक्त कचरा नव्हे, तर स्वच्छ उर्जेचा एक मौल्यवान स्रोत आहे.
ऊर्जा निर्मितीसाठी वापरू शकतो : ऋषी वैद्य
पर्यावरण नियमांनुसार वापरलेले स्वयंपाकाचे तेल धोकादायक कचऱ्याच्या वर्गात येते, पण जर ते संगठित पद्धतीने गोळा केले तर आपण या प्रदूषित घटकाला प्रणालीतून बाहेर काढून ऊर्जा निर्मितीसाठी वापरू शकतो. काही देशांमध्ये वापरलेल्या स्वयंपाकाच्या तेलाच्या मोठ्या प्रमाणात गोळा करण्यासाठी धोरणे आणि प्रक्रियाही तयार आहेत, ज्यामुळे केवळ प्रदूषण आणि तेल adulteration कमी होतोच नाही, तर जैव इंधन उत्पादनासाठी आवश्यक प्रमाणात कच्चा मालही उपलब्ध होतो असे मत टर्बोनोव्हा संस्थापक ऋषी वैद्य यांनी व्यक्त केले.