अंधेरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मुंबईतील बोहरा समाजाच्या ‘अल् जामिया-तूस-सैफिया’ या संकुलाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी बोहरा समाजाचे (Bohra Community) कौतुक केले. ते म्हणाले, ‘तुम्ही माझ्या कुटुंबासारखे आहात. इथे आल्यावर मला कुटुंबातील सदस्यासारखं वाटतं. महिलांच्या शिक्षणासाठी या संस्थेचा नेहमी प्रयत्न असतो. बोहरा समाजाचं भारताप्रती कायमच प्रेम असतं’, अशा शब्दांत त्यांनी समाजाचा गौरव केला.
बोहरा मुस्लिम समुदाय संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, ‘मी इथे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री म्हणून नाही. माझे भाग्य असे आहे की, जे कदाचित फार कमी लोकांना मिळाले. मी चार पिढ्यांपासून या कुटुंबाशी जोडलेला आहे. सर्व 4 पिढ्यांनी माझ्या घरी भेट दिली. मी तुमच्या कुटुंबातील एक सदस्यासारखा आहे. बोहरा समाजाचं भारताप्रती कायमच प्रेम आहे. महिलांच्या शिक्षणासाठी या संस्थेचा नेहमी प्रयत्न असतो. आज 150 वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झालं आहे.
बोहरा समाजाच्या सरकार पाठीशी
कुपोषणापासून ते जलसंरक्षणापर्यंत तुम्ही प्रयत्नशील आहात. पाणी वाचवण्यासाठी बोहरा समाजाचे मोठं काम, बोहरा समाजाच्या पाठीशी सरकार असल्याची ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली.
मद्रास बँडकडून मोदींचे स्वागत
अंधेरीतील मरोळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोहरा मुस्लिम समुदायाचे ‘अल् जामिया-तूस-सैफिया’ संकुलाचं उद्घाटन केले. यावेळी मद्रास बँडकडून मोदींचे स्वागत करण्यात आले.