aai tuljabhavani serial latest updates sunday 29 june telecast special episode
कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका आई तुळजाभवानी मध्ये एकीकडे देवी तुळजाभवानीचं मायाळूपण, करुणा आणि शक्ती दाखवणाऱ्या कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहेत, तर दुसरीकडे असुरीशक्तीचे प्रतिनिधित्व करणारी माया आता उघडपणे आक्रमणाच्या तयारीत दिसते आहे. येत्या रविवारी २९ जूनच्या विशेष भागात मायाचा पहिला घातक वार घडणार असून, हा क्षण प्रेक्षकांसाठी अंगावर काटा आणणारा ठरणार आहे. तेव्हा नक्की बघा ‘आई तुळजाभवानी’ २९ जून दु. ३:००, रात्री ९:०० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर!
मायाच्या हातातल्या पाच कवड्या तिच्या योजनांचं प्रतीक आहेत. यातील एक कवडी ती उचलते आणि जगदंबेला उद्देशून बोलते “तयार रहा जगदंबा, माझा पहिला वार सहन करायला.” या शब्दांमागे मायाच्या दुष्ट मनसुब्यांची सुरूवात स्पष्ट होते. साध्या स्त्रीच्या वेशात माया थेट जगदंबेच्या घरात प्रवेश करते. स्वयंपाकघरात भांड्यात शिजत असलेल्या अन्नात ती एक मायावी द्रव मिसळते, त्या द्रव्यामुळे सगळे जेव्हा दीर्घ निद्रेत जाणार तेंव्हा जगदंबाला माया तिच्यासोबत घेऊन जाण्याचे जाळ रचते. मायाच्या चेहऱ्यावर यावेळी दिसणारे असुरी हास्य तिच्या घातक नियोजनाचा प्रत्यय देते, विश्वासाचं रूप घेऊन माया देणार मृत्यूचा घास.
इलियाना डिक्रुझ दुसऱ्यांदा झाली आई, ठेवलं युनिक नाव; फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद
माया जेवणाच्या वेळी स्वतःच्या हाताने जगदंबेला घास भरवते, तिच्या चेहऱ्यावर मायाळूपणा पण डोळ्यांत मात्र कपट. दुसऱ्या हातात कवडी कुस्करून ती तिच्या कावेबाज योजनेचा आरंभ करते. गंगाई आणि जनकबाबा बाजूला जेवत असताना सगळं काही सामान्य वाटतंय, पण त्या निरागस अन्नघासामागे आहे एक भयावह कट आहे. मायाचा वार जगदंबा कसा परतवणार? याचं उत्तर मिळेल रविवार २९ जूनच्या विशेष भागात !! पहा आई तुळजाभवानी रविवार, दु. ३:०० वा. आणि रात्री ९:०० वा., फक्त कलर्स मराठीवर !!