अवघ्या काही दिवसांवरच प्रतीक गांधी आणि पत्रलेखाचा ‘फुले’ हा बॉलिवूड चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपट येत्या २५ एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंच्या भूमिकेत अभिनेता प्रतीक गांधी असून त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत अर्थातच सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत पत्रलेखा आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या चित्रपटामध्ये, फुले यांच्या तरुण वयापासूनच चित्रपटाची सुरुवात झालेली आहे. या चित्रपटामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंची तरुण वयातील भूमिका नवखा कलाकार विशाल अर्जुन साकारणार आहे.
सागर कारंडेला चुना लावणाऱ्या ‘अक्षय कुमार’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, केली होती ६१ लाखांची फसवणूक
सध्या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त सर्वच कलाकार सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. प्रमोशन दरम्यानच चित्रपटामध्ये फुलेंची तरुण वयामध्ये भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विशाल अर्जुनने ‘नवराष्ट्र डिजीटल’सोबत संवाद साधला. यावेळी त्याने त्याच्या भूमिकेसह वैयक्तिक आयुष्यातीलही काही मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला. विशालचा ‘फुले’ चित्रपट हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटाच्या माध्यमातूनच त्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले आहे. या निमित्त त्याला तुझा पहिल्याच चित्रपटामध्ये अभिनय करण्याचा अनुभव कसा होता ? आणि आता अवघ्या काही दिवसांवरच तुझा पहिला चित्रपट रिलीज होतोय, काय तुझी प्रतिक्रिया ? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
Athiya Shetty आणि KL Rahul ने शेअर केला मुलीचा पहिला फोटो, नावही केलं जाहीर; अर्थही आहे खास
या प्रश्नावर त्याने प्रतिक्रिया दिली की, “इतक्या महान व्यक्तिमत्वावर आधारित असलेला माझा पहिलाच चित्रपटाचं प्रदर्शन अवघ्या काही दिवसांवरच आहे. खूप छान वाटतंय. खरंतर, सध्या माझ्या कृतज्ञतेची भावना आहे. पहिलाच चित्रपट असल्याने मनात आनंदाची भावना आहे. मी गेल्या १० वर्षापासून अभिनय करतोय. पथनाट्य, नाटक, एकांकिका, शॉर्ट फिल्म्स आणि गाणे या माध्यमातून मी माझ्या फिल्मी करियरला सुरुवात केली. माझं स्वप्न खरंतर आता स्वप्नात उतरत आहे. सध्या तरी, माझी शब्दात मांडू न शकणारी भावना आहे. मी चित्रपटामध्ये ज्योतिबा फुलेंची तरुणपणाची भूमिका साकारलीये. हे पात्र साकारताना माझ्यावर काही अंशी दडपण सुद्धा होतं आणि जबाबदारीही होती. पण त्यातही मी न डगमगता ते पूर्ण केलं. पण आता खूपच मी आनंदित आहे.”
मिलिंद गवळींनी घेतलं सपत्नीक सिद्धीविनायकाचं दर्शन, पोस्ट शेअर करत सांगितला मंदिरातील खास अनुभव
चित्रपटामध्ये काम करण्याच्या अनुभवाबद्दल विशालने सांगितले की, ” खरंतर मी यापूर्वी नाटक आणि शॉर्टफिल्म्समध्ये काम केले आहे. पण तरीही चित्रपटामध्ये काम करतानाचा अनुभव फार वेगळा होता. दोन्हीही माध्यम फार वेगवेगळे आहेत. जेव्हा मला चित्रपटाची ऑफर मिळाली, त्यावेळी मी शब्दात न मांडू शकणाऱ्या माझ्या फिलिंग्स होत्या. मार्च २०२३ पासूनच माझ्या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद महादेवन यांच्या टीमसोबत काम करतानाचा अनुभव खरं सांगायचं तर खूपच वेगळा होता. तुम्ही आम्ही सगळेच त्यांचे चित्रपट फार आधीपासूनच पाहत आलोय. ‘मी सिंधुताई सकपाळ’ चित्रपटापासूनच मी त्यांच्यासोबत काम करण्यासाठी आतुर होतो. अखेर मला ती संधी मिळाली आणि आता लवकरच तुम्हाला हा चित्रपट रुपेरी पडद्यावर पाहायला मिळेल.”
कोण आहे Emma Bakr? रॅपर हनी सिंगला करत आहे डेट; Video Viral…
चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत नारायण महादेवन यांनी केलं आहे. ऐतिहासिक विषयावर दमदार हातखंडा असलेल्या महादेवन यांनी याआधीही अनेक महत्त्वाचे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. महात्मा फुले यांच्या भूमिकेत ‘स्कॅम १९९२’ फेम प्रतीक गांधी दिसणार असून, सावित्रीबाई फुले यांची भूमिका पत्रलेखा साकारत आहे. ‘फुले’ चित्रपटाचे निर्माते प्रणय चोक्शी, जगदीश पटेल, रितेश कुडेचा,अनुया चौहान कुडेचा, सुनील जैन आणि डॉ. राज खवारे असून, सहनिर्मितीची जबाबदारी क्रांती शानभाग, कलापी नागडा,रोहन गोडांबे, परीधी खंडेलवाल यांनी उचलली आहे. झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित यांच्या माध्यमातून ‘ फुले’ हा हिंदी चित्रपट जगभर २५ एप्रिल २०२५ प्रदर्शित होणार आहे.