milind gawali shared post on indian railway mumbai local said passangers safety is must
‘आई कुठे काय करते’ मालिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरांत अभिनेते मिलिंद गवळी यांनी प्रसिद्धी मिळवली आहे. मालिका आणि चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेय. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारे मिलिंद गवळी कायमच सोशल मीडियावर सक्रिय राहतात. ते सोशल मीडियावर अनेकदा समाजातील घडामोडींवर किंवा त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींवर ते भाष्य करत असतात.
शेअर केलेल्या इन्स्टा पोस्टमध्ये नुकतंच अभिनेते मिलिंद गवळी यांनी रेल्वे अपघातावर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. पोस्टमध्ये मिलिंद यांनी मुंब्रा- दिव्या दरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताचा उल्लेख केला आहे. त्या रेल्वे अपघातात अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता, त्याबद्दल त्यांनी या पोस्टमधून सांगितलं आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये मिलिंद गवळी यांनी लिहिलंय की…
गेल्या २० वर्षांमध्ये ५१ हजार लोकांचा मुंबईत रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. ९ जूनला विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन ट्रेनमध्ये खांबाला लटकलेली माणसे एकमेकांना आदळली आणि १४ जण खाली रुळावर पडली. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. अनेक वर्षांपूर्वी माझ्या शारदाश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका वर्गीस मॅडम रेल्वेतून उतरताना वांद्रे येथे प्लॅटफॉर्मवर पडल्या, त्या अपघातात त्या गेल्या. आपल्या आजूबाजूला असंख्य लोकं आहेत ज्यांचा कोणना कोणतरी रेल्वेमध्ये दगावला किंवा जखमी झाल्या आहे, गेल्या पंधरा वर्षांमध्ये १४,००० मृतदेह enclaimed आहेत, त्यांची ओळखच पटलेली नाहीये. जगातली सेफेस्ट safest railway in the world Japan’s Shinkansen (bullet train) गेल्या पन्नास वर्षात एकही मृत्यू नाही, zero fatality rate, दोन नंबर China, आणि तिसरा नंबर स्वित्झर्लंड safe trains. भारतीय रेल्वे पाकिस्तान आणि बांगलादेश पेक्षा बरी आहे एवढेच. ब्रिटिशांनी रेल्वे बांधली त्यावेळेला तीन क्लासेस होते, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्लास होता, मग स्वातंत्र्यानंतर आपण फर्स्ट क्लास आणि सेकंड ठेवला थर्ड क्लास काढून टाकला, माझं तर असं मत आहे की सेकंड क्लास पण काढून टाकावा, आपण सगळे भारतीय फर्स्ट क्लासच आहोत, public transports मध्ये मेट्रोत कुठलाही क्लास नसतो, सगळेच प्रवासी फर्स्ट क्लास असतात. भारतामध्ये लोकसंख्या ही सगळ्यात मोठी समस्या आहे, त्यामुळे कितीही सुधारणा केली तरी ती कमीच पडत जात असते, पूर्वी मेट्रो ने फार कमी लोक जायचे, मोकळ्या असायच्या, आता परवा अंधेरीच्या पासपोर्ट ऑफिसला मी मेट्रो ने गेलो, जाताना वर्सोवावरनं सुटत असल्यामुळे बसायला जागा मिळाली, पण येताना साडेचार वाजता चकाला स्टेशनला रेल्वेला असते तशीच तुडुंब गर्दी होती, एकमेकांना डब्यात कोंबत होते,मी नशीबवान आहे, मला प्रवासाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे मी त्या चेंगराचेंगरी, गर्दीमध्ये गेलो नाही,पण सगळ्यांनाच तो choice नसतो.पण आपल्या सगळ्यांना गरीब असो की श्रीमंत dignity ने माणसांसारखा प्रवास करायला मिळावा. घुरंढोरां सारखा नाही. Irony is जगातली सगळ्यात महागडं luxurious ट्रेन तिकीट भारतीय रेल्वे heritage of India, presidential suite चं तिकीट २० लाख रुपये आहे. आता या ट्रेनमध्ये मला प्रवास करायला आवडेलच पण त्याचबरोबर मला सामान्य लोकांसाठी असलेली रेल्वे मध्ये सुद्धा सकाळच्या वेळेला दादर स्टेशनला शांतपणे बसून प्रवास करायला सुद्धा आवडेल. जपान सारखं माणसांच्या जीवाची जाणीव आपण ठेवायला हवी. सगळ्यांचा प्रवास Safe चं करायला हवा.Safety साठी योग्य ते बदल करायला हवेत.
अमृता सुभाष- अनिता दातेच्या ‘जारण’ ची बॉक्स ऑफिसवर किमया, तीन आठवड्यांत सहा कोटींहून अधिकची कमाई